शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. नसेल पाठवायचे तर नकार तरी द्यावा*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कधी ओसरणार?*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कधी ओसरणार ?
नदीला आलेला पूर
दिसेना कुठे वस्ती
पाणीच सर्व दूर

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩵✍️🩵♾️♾️♾️♾️
*कधी ओसरणार?*

कधी ओसरणार वरूणराजा
सांग तुझा रे जोर
नको अंत पाहू नुकसानीचा
ठरू नकोस बघ शिरजोर

श्री.पांडुरंग एकनाथ घोलप, रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩵✍️🩵♾️♾️♾️♾️
*कधी ओसरणार*

पावसाचा तांडव
कधी थांबणार
पुराने सारं उध्वस्त
कधी ओसरणार

*सौ. प्रांजली जोशी, विरार , पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩵✍️🩵♾️♾️♾️♾️
*कधी ओसरणार*

झाले,नेस्त नाबूत घरे
खचले,विशाल डोंगर,
प्रेताचा खच पडला
कधी ओसरणार पूर.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🩵✍️🩵♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿ह
*कधी ओसरणार*

हा खेळ भावनांचा
चुराडा संवेदनांचा
कधी ओसरणार निसर्गा
हा छळ मानवाचा

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩵✍️🩵♾️♾️♾️♾️
*कधी ओसरणार*

टपोरे थेंब घेऊन आलास
आणि धो धो बरसलास
आता कधी ओसरणार तू
बालकांची शाळा बुडवलास

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩵✍️🩵♾️♾️♾️♾️
*कधी ओसरणार*

जिकडे, तिकडे पाणीच, पाणी
हतबल झाले सारेच्या,सारे
कधी ओसरणार पूरपरिस्थिती
केव्हा घरी जातील बेघर बिचारे

*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩵✍️🩵♾️♾️♾️♾️
*कधी ओसरणार?*

थांबव हा विनाशाचा जलप्रलय
वरुणराजा तु कधी ओसरणार?
अवनी देई हुंदके अन् डोयांत
तिच्या वाहे आसवांचा महापुर

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
दादरा आणि नगर हवेली
*©️सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🩵✍️🩵♾️♾️♾️♾️
*कधी ओसणार*

कधी ओसणार हा दुःखाचा पूर
खंबीर मन करून लढा दिला
स्वतः स केले सिद्ध पुरेपूर
नियती ला ही दाखला दिला

*वर्षा मोटे / पंडित*
छत्रपती संभाजी नगर
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🩵✍️🩵♾️♾️♾️♾️
*कधी ओसरणार?*

आवतंन दिलं तुला तेंव्हा
शिणून गेलो तू कधी पडणार?
आला मेघराजा तू असा कसा
वाट पाहतो कधी ओसरणार?

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles