
इथंही गाव होतं
डोंगराच्या कुशीत वसलेलं.
इथंही गाव होतं एक न्यारं.!धृ!
सरितेची खळखळणारी वाणी.
पक्षीही गायचे गोड मंजूळ गाणी.
समानतेच वाहत होतं लई वार.
इथंही गाव होतं एक न्यार.!1!
घरोघरी होत्या मातीच्याच चुली.
सुखाने भाकरी थापायच्या सुन मुली.
रमणीय वातावरण होतं सार.
इथंही गाव होतं एक न्यार.!2!
कंदमुळे,रानमेवा आणायची माणसं.
बाळगोपाळांना आवडायची कणसं.
चंद्रमौळी झोपडीला नव्हती तिथं दारं .
इथंही गाव होतं एक न्यार!3!
समूहात राहायचे ग्रामदेवता पुजायचे.
सणोत्सव साजरे करून संस्कृती जपायचे.
स्वच्छंदी बगडायचे तिथे तरुण पोरं.
इथंही गाव होतं एक न्यार.!4!
दुष्टच लागली काळाने झडप घातली.
अतिवृष्टीमुळे अचानक दरड कोसळली.
झोपेतच जमीनदोस्त झालं गाव प्यारं.
इथंही गाव होतं एक न्यार.!5!
प्राजक्ता आर खांडेकर
सुगत नगर, नागपूर