
स्व.देवकीबाई बंग मराठी शाळेत म.गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान संपन्न
हिंगणा: येथील स्व.देवकीबाई बंग मराठी प्राथमिक शाळेत आज सोमवार (२ आक्टो.) रोजी महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी वर्गशिक्षिका छाया बोरकर व मुख्याध्यापिका यांनी शालेय परिसर मुलांकडून स्वच्छ करून पर्यावरण स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. याप्रसंगी वर्ग ३ रीतील कु.हर्षिता पाटील व परिधी कोल्हे यांनी कस्तुरबा गांधी यांची वेषभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.