जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग; सर्वोच्च न्यायालय

जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग; सर्वोच्च न्यायालयपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत येणार की नाही यावर आज सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे.जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग; सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे घटनेतील ‘कलम 370’ रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्टया वैध होता की अवैध याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केले आणि राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे दोन भाग केले आणि दोन्ही केंद्रशासित प्रदेश केले. याविरोधात सुप्रीम कोर्टात 23 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सर्व याचिकांची सुनावणी घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सप्टेंबरमध्ये निर्णय राखून ठेवला होता.

कलम 370 नुसार जम्मू-काश्मीरला राज्यघटनेत विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता. तो मोदी सरकारने घटनादुरुस्तीने हटवला. कलम रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या घटनापीठाने निकाल दिला आहे.

केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा घटनेतील कलम 370 रद्द केले. त्यानंतर राज्याची जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी केली होती. त्यानंतर या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारतर्फे महाधिवक्ता आर. वेंकटरमणी, महान्याय अभिकर्ता तुषार मेहता, ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे, राकेश द्विवेदी, व्ही. गिरी आदींनी बाजू मांडली होती. तर कपिल सिबल, गोपाल सुब्रमण्यम, राजीव धवन, जफर शाह, दुष्यंत दवे आणि अन्य ज्येष्ठ वकिलांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद केला होता. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने 2 ऑगस्टपासून या प्रकरणी दररोज सुनावणी सुरू केली होती. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी याचिकांवरील निर्णय राखून ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles