येड्यात’ काढू नका ना?

येड्यात’ काढू नका ना?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आज थापाड्यांचा दिवस म्हणजे थापा मारून आनंद साजरा करण्यासाठी मान्यताप्राप्त दिवस. कुणालाही मूर्ख बनवणे सध्या प्रत्येकालाच जमेल असेही नाही. परंतु प्रयत्न करणारे अनेक असल्याने आजच्या दिवसाचे महत्व. ‘दिनविशेष’ ही म्हणता येईल. खरे पाहता ‘एप्रिल फूल’ या दिवसाचा उगम फ्रान्समध्ये झाला. सन 1564 मध्ये फ्रान्सचा राजा चार्ल्स नववा याने जाहीर केलं की, फ्रान्समध्ये नवीन वर्ष 1 जानेवारीपासून सुरू होईल. त्याआधी ख्रिश्चन देशांमध्ये नवीन वर्ष इस्टरच्या सणानंतर, म्हणजे साधारण मार्चचा शेवटचा आठवडा किंवा एप्रिलच्या पहिला आठवड्यात सुरू व्हायचं.

पण इस्टरचं कॅलेंडर आपल्या भारतीय कॅलेंडर प्रमाणेच चंद्राच्या हालचालींवर ठरायचं. म्हणजे त्याची तारीख ठरलेली नव्हती. म्हणून मग सौर कालगणनेप्रमाणे एक जानेवारीपासून नववर्षं साजरं करायचं ठरलं. 25 मार्चला इस्टरचं नवं वर्ष सुरू व्हायचं आणि एक एप्रिलला नववर्षाच्या उत्सवाची सांगता व्हायची. फ्रेंच राजाने तर सांगितलं की, आपण ग्रेगोरियन कॅलेंडर वापरायचं, म्हणजे एक जानेवारीला नवीन वर्ष सुरू होणार. पण तरीही जे लोक राजाच्या या आदेशानंतरही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच नवीन वर्ष साजरं करायचे, विशेषतः जे फ्रेंच नव्हते, त्यांना एप्रिलचे मूर्ख (एप्रिल फूल) असं म्हटलं जाऊ लागलं.

तर काहींचं म्हणणं आहे की या दिवसाचा उगम 21 मार्चच्या सूर्याच्या पोझिशनमध्ये आहे. 21 मार्चला व्हर्नल इक्विनॉक्स म्हणतात. म्हणजे या वर्षातल्या या दिवशी दिवस आणि रात्र समसमान काळाचे असतात. या दिवशी वातावरणात जे बदल होतात, त्यामुळे कोणताही माणूस मुर्खात निघू शकतो. या दिवसाची प्रेरणा घेऊनच ‘एप्रिल फूल’ दिवस साजरा केला जातो असाही एक मतप्रवाह आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. पण सगळ्या परंपरामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे समोरच्याला वेड्यात काढायची.

फ्रान्समध्ये ज्या माणसाचा या दिवशी ‘पोपट होतं’ त्याला फ्रेंच भाषेत ‘एप्रिल फिश’ असं म्हणतात. याचा संदर्भ छोट्या माशांशी जोडता येऊ शकतो जे पटकन जाळ्यात अडकतात. फ्रेंच लहान मुलं या दिवशी त्यांच्या मित्रांच्या पाठीवर कागदी मासे चिकटवतात. एप्रिल फूलला फिश डे म्हणण्यामागे हेही कारण असू शकतं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फ्रान्सचे झरे आणि नद्यांमध्ये माशांची संख्या वाढते. हे मासे अलगद जाळ्यात येतात. जणू काही मुर्ख मासे आहेत. स्कॉटलंडमध्ये याच दिवशी ‘गॉकी डे’ साजरा होतो. याचा शब्दशः अर्थ ‘मुर्खाचा दिवस’. याला एक कमी प्रचलित पण लैंगिक अर्थ पण आहे, तो म्हणजे ज्याच्या बायकोने त्याला धोका दिला आहे, किंवा ज्याच्या बायकोचे दुसऱ्याशी संबंध आहेत आणि त्याला माहिती नाही, असा मुर्ख. या दिवशी मित्रांच्या पाठीवर ‘किक मी’ असं लिहिलेलं कागद चिकटवायची पद्धत स्कॉटलंडमध्ये आहे.

संपादक
‘साप्ताहिक साहित्यगंध’
marathicheshiledar6678@gmail.com
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles