
गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेचा ज्वलंत आणि जिवंतकर्ता म्हणजे अरविंद कात्रटवार. आज त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा…..
शिवसेना म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी. सोबतच मराठी माणसाला स्वाभिमानाने जीवन जगवण्यासाठी धडपडणारी हीच ती शिवसेना.
शिवसेना म्हणजे महाराष्ट्र राज्याची आन, शान आणि बाण….सोबतीलाचं पक्षाचे बोधचिन्ह आहे तेदेखील धनुष्यबाण…
शिवसेना, हिंदुहृदयसम्राट आणि पक्षप्रमुख यांच्यावर अमाप विश्वास आणि निष्ठा ठेवणारा खरा शिवसैनिक म्हणजे गडचिरोली येथील अरविंद कात्रटवार.
सत्ता नव्हती तरीही हा शिवसैनिक गोरगरिबांना न्याय मिळवून देत होता, त्यांची अडली-खितपत पडलेली कामे करीत होता. आज त्यांचा वाढदिवस…त्यानिमित्ताने अरविंद कात्रटवार या खऱ्या-निष्ठवान शिवसैनिकाचा हा जीवनप्रवास….
अरविंद कात्रटवार….फक्त नावच पुरेसे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय पटलावर हे नाव कुणी कधीही टाळूच शकत नाही, असं हे नाव. अगदी सुरुवातीपासून. जेव्हा शिवसेना सत्तेत नव्हती तेव्हाही. खरा शिवसैनिक कसा असतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. सामान्य लोकांची असामान्य कामे करणारे हे नेतृत्व आहे.
गोरगरिबांना न्याय मिळवून देत त्यांची अडली-नडलेली कामे करीत असताना प्रसंगी अरविंद कात्रटवार यांच्यासमोर आणीबाणीचे प्रसंग आले. आर्थिक, मानसिक, शारीरिक अशा कितीतरी प्रसंगात ते डगमगले नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून या जिल्ह्यात शिवसेना ज्वलंत, जिवंत आणि संघटना वाढीसाठी प्रयत्न केले. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करताना त्यांनी कधीही समाजाला दुर्लक्षित केले नाही.
अनेकदा त्यांच्यासमोर मोठे बिकट प्रसंग आले. सत्ता नसताना संघटना सोडून जाणारे कितीतरी गेले आणि परत आले. परंतु गडचिरोली जिल्ह्यात अरविंद कात्रटवार यांनी शिवसेना जिवंत ठेवली. एवढंच काय, तर त्यांनी तिला ज्वलंत करून अधिक वाढविली. स्वतःसाठी जगणारे खूप राजकारणी आहेत. पण पक्षाच्या ध्येयासाठी झटणाऱ्या या नेत्याला यामुळेच सिरोंचा ते कोरचीपर्यंत मान्यता मिळाली.
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, समाजातील ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी, संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी अग्रणी नाव म्हणून अरविंद कात्रटवार यांची गडचिरोली जिल्ह्यात नोंद होते. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना भविष्यात प्रमुख नेतृत्व मिळो, या सदिच्छा आहेत…..