रूपाली चाकणकरांना२४ तासात ठार मारू; अज्ञाताची फोनवरून धमकी

रूपाली चाकणकरांना 24 तासात ठार मारू; अज्ञाताची फोनवरून धमकी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विशेष प्रतिनिधी

मुंबई. महिला आयोगाचा कारभार स्वीकारल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडींवर लगेच दखल घेत कामाचा धडाका लावला आहे. अशातच रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन कॉल आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका अज्ञात व्यक्तीने फोन करून चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या फोन कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे. आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात फोन करून या अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. या प्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

महिला आयोगाकडून तातडीने स्थानिक पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांना कुणी फोन केला, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. मात्र, महिला आयोगाच्या अध्यक्षांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून राज्य महिला आयोगाला धमकीचा फोन आल्याची माहिती दिली आहे. धमकीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. धक्कादायक म्हणजे, धमकीचा मागील काही दिवसांतील हा तिसरा फोन आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles