
सचिन मेश्रामांनी खंडणी न दिल्याने ब्लँकमेलिंग व बदनामी
_या संदर्भात वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार दाखल_
नागपूर : संकल्प सेल्स कॉर्पोरेशनचा मालक सचिन मेश्राम गेल्या दहा वर्षांपासून ग्राहकांना इलेक्ट्रानिक वस्तू व लाकडी फर्निचर इएमआय स्वरूपात देत असतात. त्यांचे कपील नगर नागपूर, पारशिवनी, रामटेक व मौदा येथे शोरूम आहे. कर्मचारी सुनीता चित्रसेन पाचे यांनी विश्वास संपादन केला. त्या विश्वासावर मेश्राम यांनी आर्थिक व्यवहार, चेक व स्टॅम पेपर सही करून तिच्याकडे सोपविले. मात्र सुनीताने वैयक्तीक व्यवहार ग्राहकांसोबत सुरू केले व पैशांची अफरातफर करणे सुरू केले. हे लक्षात आल्यावर मी तिला नोकरीवरून काढले. तिच्याकडे असलेले स्टॅम्प पेपर व चेक मी परत मागितले. तेव्हा तिने ५० लाखांची मागणी केल्याची माहिती आज दि ३० मे रोजी आयोजित पत्रपरिषदेत संकल्प सेल्स कॉर्पोरेशन चे मालक -सचिन सुखदेव मेश्राम, अश्विनी सचिन मेश्राम, विजय देऊळकर, वैशाली राजेश गेडाम आणि विद्या मांडवे यांनी दिली.
खंडणी देण्यास मी नकार दिल्यावर संकल्प सेल्सच्या नावे खोटे आरोप करून गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिली. तसेच मिडिया चॅनलवरही खोटी बातमी देऊन बदनाम करण्याची धमकी दिली. या संदर्भात पोलिस आयुक्त, ग्रामीण पोलिस अधीक्षक येथे लेखी स्वरूपात दि. १९ एप्रिल २०२२ ला तक्रार दाखल केली.
मात्र मला न्याय मिळाला नाही.
सौरभ सुरेश जैन, चैतन्यनगर, नागपूर हा देखील माझ्या फर्ममध्ये काम करायचा. जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रशासकीय काम बघत होता. त्याने देखील GST करिता घेतलेले पैसे स्वत: खर्च केले. त्यालाही जानेवारी २०२२ ला कामावरून कमी केले. प्रणय वासुदेव गोमासे, पारशिवनी येेथे राहत असून, त्याने देखील सुनीता पाचे प्रमाणेच पैशांची हेराफेरी करणे सुरू केले. ही बाब निदर्शनास आल्यावर त्याचेही काम बंद केले. मात्र, चेक आणि स्टॅम्प पेपर त्याने अजूनही परत केले नाही. ते मागीतले असता सुनीता प्रमाणेच धमकी देऊन ब्लॅकमेल करत आहे. या तिघांनी एकत्र येवून खंडणीच्या रूपात पैशांची मागणी सुरू केली. तसेच ‘नागपूर समय सोशल मिडिया’ न्यूज चॅनलवर तुमची बदनामी करून बातम्या टाकू असे धमकावले आहे.
त्यामुळे मुकेश शाहू देखील हा व्यवहार सेट करण्याकरिता पैशाची मागणी करीत आहे. या चार जणांविरूद्ध लेखी तक्रार पोलिस आयुक्त, डीवायएसपी रामटेक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पारशिवनी तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कपील नगर येथे तक्रार नोंदवली आहे. मात्र अजूनही पोलिसांनी अजूनही कारवाई केली नाही.