Home ताज्या घटना …तर दिपाली सय्यदला घरात घुसून बदडून काढू; भाजपचा इशारा

…तर दिपाली सय्यदला घरात घुसून बदडून काढू; भाजपचा इशारा

103

….तर दीपाली सय्यदला घरात घुसून बदडून काढू; भाजपचा इशारा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान मोदींवर टीका करताना दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीपाली सय्यद यांची जीभ घसरली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत या नेत्यांना पाठीशी घालणारा असा लुच्चा पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल. ‘किरीट सोमय्यांच्या जागी मोदी जरी असते तरी गाडी फुटली असती’ अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दीपाली सय्यद यांनी टीका केली होती.

योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागते. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?’ असं वादग्रस्त वक्तव्य करत बोचरी टीका दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही केली होती.
भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेवरुन अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत.

केवळ प्रसिद्धीसाठी दीपाली सय्यद यांची ही सर्व उठाठेव सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी उमा खापरे यांनी केली आहे. तसंच यापुढे दीपाली सय्यद यांनी कोणत्याही भाजप नेत्याबद्दल अपशब्द वापरला तर आम्ही दीपाली सय्यद यांना घरात घुसून बदडून काढू असा इशाराही उमा खापरे यांनी दिला आहे.