
शिवसेनेचे भाजपाविरूध्द ‘छुपे’ कारस्थान
_भाजप म्हणते चोरांच्याच उलट्या बोंबा_
औरंगाबाद: मराठवाडा विभागातील औरंगाबाद महापालिका निवडणूक कार्यक्रमापूर्वीच प्रारुप आराखड्याचे काम सुरु आहे. यावरुन औरंगाबादेत राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजप आणि शिवसेना दोघेही दंड थोपटत मैदानात उतरले आहेत.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट निवडणूक आयोगाकडे प्रारुप आराखडा अंतिम होण्यापूर्वीच व्हायरल होतो कसा यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे. महापालिका आयुक्त थेट जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोमवारी मुंबईत निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी निवेदन दिले आहे.
व्हायरल झालेला आराखड्यात तथ्य आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कमी निवडून यावे हा सगळा खटाटोप आहे. त्यावर भाजपाने किंवा इतर पक्षाने आक्षेप घेऊ नये म्हणून शिवसेनेच्याच लोकांनी गदारोळ करायला सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजू शिंदे यांनी शिवसेनेवर आरोप करीत ज्यांनी आराखडा व्हायरल केला तेच आता बोंब मारत आहेत. या चोराच्या उलट्या बोंबा असे त्यांनी म्हटले आहे.
या सर्व प्रकरणात सूत्रधार म्हणून जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी भूमिका निभावली. त्यांनी शहरातील दोन शिवसेना आमदारांना हाताशी धरून हा संपूर्ण डाव रचल्याचा आरोपही संजय शिरसाठ यांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे यांनी केला आहे.