

मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण?
_सुप्रिया, अजित की रोहित…?_
पुणे :- मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवार यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे पुजाअर्चा व अभिषेक करत आहेत. नातू आ. रोहित पवार हे देखील मोठ-मोठ्या लोकांवर वक्तव्य करुन पुढे येत आहेत. तर पवारांचे पुतणे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे, सुप्रिया, अजित की रोहित… यापैकी पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा नेमका उमेदवार कोण? हे पवारांनी घरच्या घरी ठरवून घ्यावे, असा टोला भाजप नेते प्रविण दरेकरांनी पवार कुटुंबीयांना लगावला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
*रोहित पवारांना दरेकरांचा खोचक सल्ला*
आ. रोहित पवारांनी नुकतीच आमदार बनून राजकारणाची इनिंग सुरु केली आहे. आपली उंची काय आपण बोलतोय काय याच भान रोहित पवारांनी ठेवाव. अजित पवार नेहमी सांगतात वाद-विवाद करु नका त्यापेक्षा लोकांचे कामं करा. त्यामुळे तुम्ही देखील तसे काही करु नका. गोपीनाथ मुंडे आता हयात नाही. त्यांच्या संदर्भात वक्तव्य करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही तुमच्या घरातली काळजी घ्या, असा खोचक सल्लाही प्रविण दरेकरांनी रोहित पवारांना दिला. रोहित पवारांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर खोचक वक्तव्य केले होते. त्यावर प्रवीण दरेकर बोलत होते.