सचेतन तोवर मोती, अचेतन देहाची माती’; विष्णू संकपाळ

सचेतन तोवर मोती, अचेतन देहाची माती’; विष्णू संकपाळ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

गहन चित्र
कर्म गती विचित्र
अंतिम सत्र

मानवी जन्मच एक अनाकलनीय कोडे आहे. जे सोडवावे तितके थोडेच. भारतीय तत्त्वज्ञानानुसार मानवी शरीर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वांनी व्यापले आहे. आणि अंती यातच ते विलिन होणार असते. मात्र हीच विलिनता किंवा अंतीम क्षण सुखावह व्हावा यासाठी जीवनभर धडपड असते. आत्म्यास सद्गती प्राप्त होवो असे म्हंटले जाते. अर्थात ती कोणाला कशी होते हा विषय अजून खूप गूढ आहे. मात्र सद्गतीच्या प्राप्तीसाठी कर्मगती सत्कर्माच्या मार्गावर प्रविष्ट होणे आवश्यक असते. मृत्यू अटळ आहे, तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. यासाठी हाती असलेला वेळ देहाच्या माध्यमातून सद्गतीकरीता वेचणे यातच जन्माची सार्थकता आहे.

आजचे हायकू चित्रच बघा ना! वरवर पाहता किनार्‍याचाच एक भाग आहे. मात्र व्यक्त होणारा संदेश खूपच मार्मिक आहे. एक मानवी आकृती जी अचेतन अवस्थेत दिसते. आणि एका बाजूला माती (पृथ्वी ) तर दुसर्‍या बाजूला जल. शिवाय वाळवी सदृश्य किटकांनी देहाचा ताबा घेतला आहे. या अशा चित्राचा नेमका वेध घेऊन कल्पक हायकू करणे हेच खरे आव्हान आहे.

क्रूसावर लटकवलेल्या येशूच्या प्रतिमेशी काहीसे साधर्म्य दर्शविणारे हे चित्र गृहीत धरल्यास संदेश असा मिळतो की, मानवी देह नष्ट होईपर्यंत मानवतेची सेवा संयमाने व्हावी. हे करताना बाह्यशक्तिकडून, खलप्रवृत्तीकडून कितीही यातना झाल्या तरीही बेहत्तर. पण प्रेमाचे अत्तर वाणीतून निरंतर बरसत रहावे. दुसरी गोष्ट मनात येते की हे चित्र म्हणजे अचेतन मानवी देह आहे. मग हा घात की अपघात? हत्या की आत्महत्या? मृत जीवाच्या कलेवराला पाणी सुद्धा थारा देत नाही. ते त्याला किनार्यावर फेकतेच. आणि अचेतन झाल्याने ते कृमीचे भक्ष्य बनते म्हणूनच जीवदशा खूप विचित्र असते.

समूह प्रमुख आदरणीय राहुल दादा. नेहमीच वैविध्यपूर्ण चित्र देऊन हायकूकारांच्या प्रतिभेला आव्हान देतात. आजच्या किंचित अवघड चित्राचा वेध घेत अनेकांनी खूप छान रंग भरले. तथापि ५+७+५ या आकृतीबंधात कलाटणी सदृश्य संदेश साधताना.. तो, ती, हे, हा, ही असे भरीची एकाक्षरे टाळावीत.आणि मार्मिक भाष्य करण्याचा प्रयत्न करावा.. जपानी हायकूकारांच्या मते चित्रातला अचूक क्षण पकडता आला पाहिजे… तूर्तास येथेच थांबतो.. सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा आणि आज मला परिक्षण लिहायची संधी दिल्याबद्दल आदरणीय दादांचे मनःपूर्वक आभार.

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles