आरोग्य सेवकांना पदोन्नती द्या; अन्यथा तीव्र आंदोलन

आरोग्य सेवकांना पदोन्नती द्या; अन्यथा तीव्र आंदोलन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या नागपूर विभागातील आरोग्य सेवेमध्ये कार्यरत आरोग्य सेवक यांच्या पदोन्नती मागील दोन वर्षापासून रखडल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नागपूर विभागातील आरोग्य सेवेमध्ये कार्यरत आरोग्य सेवकांच्या पदोन्नती, मागील दोन वर्षापासून रखडलेल्या आहेत.जय जवान जय किसानचे सचिव अरुण वनकर आणि दिपक गोतमारे यांनी आज ०९ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, आरोग्य सेवकांना पदोन्नतीचे आदेश जारी न केल्यास तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल असा इशारा दिला आहे.

*काय आहे प्रकरण?*

30 में 2022 ला आरोग्य सेवेचे सहसंचालक डॉ. स्वप्नील लाडे (पुणे) यांनी नागपूर विभागात नियमानुसार पदोन्नती करण्याचे आदेश जारी केले. सहायक संचालक (हिवताप) डॉ. शाम निमगडे यांनी पदोन्नती संबधात योग्य ते मार्गदर्शन सहसंचालक डॉ. स्वप्नील लाडे यांना पत्र पाठवून मागीतले. परंतु त्यांच्या मार्गदर्शन आदेशाची वाट न बघता आज किंवा उद्या ते पदोन्नतीची यादी जाहिर करणार आहेत असे सांगितले,

दोन वर्षापूर्वी डॉ. शाम निमगडे यांनी या नियमाचा वापर न करता पदोन्नतीद्वारे सोईच्या ठिकाणी नियुक्ती व्हावी म्हणून सेवाज्येष्ठता डावलून अनेक आरोग्य सेवकाकडून पैसे घेवून पदोन्नती यादी तयार केली होती, आरोग्य सेवेत कार्यरत कर्मचान्यांच्या संघटनानी संयुक्तपणे याला विरोध केला होता. हे प्रकरण मंत्रालयात गेल्यामुळे सचिव स्तराच्या अधिकाऱ्यांनी या पदोन्नतीला स्थगिती दिली होती.

मंत्रालयापर्यंत पैसे घेण्याच्या चर्चा गेल्यामुळे पदोन्नतीचे आदेश जारी होत नव्हते, त्यामुळे आरोग्य सेवकांनी दोनदा आमरण उपाषण, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन आदी प्रकीया पार पाडली, परंतु मंत्रालयाद्वारे पदोन्नतीच्या प्रक्रीयामध्ये झालेल्या भ्रष्ट्राचारामुळे स्थगीती उठविण्यात येत नव्हती. डॉ. शाम निमगडे यांनी जुन्याच पध्दतीने आरोग्य सेवकाकडून पैसे घेवून सोईच्या ठिकाणी नियुक्ती आदेश यादी तयार केली आहे. त्यामुळे आरोग्य सेवकात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नागपूर विभागात 97 जागा पदोन्नतीस पात्र आहेत.

आरोग्य सेवेच्या उपसंचालिका श्रीमती विनीता जैन यांना या संबंधात आज संघटनाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून या पत्रपरिषदेच्या माध्यमाने त्यांन आवाहन करण्यात येत आहे की. डॉ. शाम निमगडे याना समुपदेशनाद्वारे पदोन्नती व नियुक्तीस्थळ यादी करण्यात यावे. असे आदेश जारी करावे, अन्यथा आरोग्य उपसंचालक कार्यालय या भ्रष्ट्राचारामध्ये सामिल आहे. हा संदेश जनतेत जाईल. तेव्हा हे आदेश जारी न केल्यास तिव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल असेही ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles