आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा २३ वा वर्धापन दिवस

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा २३ वा वर्धापन दिवसपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दि १० जून २०२२ रोजी २३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. पक्षस्थापने पासूनची गेल्या २२ वर्षांतील वाटचाल ही अतिशय अभिमानाची असल्याचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, शेखर सावरबांधे आणि प्रवक्ते संतोष सिंह यांनी आज दि ०९ रोजी आयोजित पत्र परिषदेत माहिती दिली.

या प्रदीर्घ कालखंडात पक्षाने केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये सहभागी होउन तसेच वेळप्रसंगी विरोधी पक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार म्हणून जनतेसाठी कार्य सुरु होताच करोना महामारीचे संकट समोर आले. हे संकट आव्हान म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने स्वीकारले. गावातील शेवटच्या घटका पासून तर शहराच्या प्रत्येक नागरिकापर्यंत ही आरोग्य सेवा पोहोचवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी घेतली.

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट तर्फे देण्यात आलेल्या फेस शिल्ड सॅनिटायझर, मास्क वाटप, समाजातील गरजू व कोरोना काळात पालकत्व हरपलेल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च तसेच राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमार्फत उचलण्यात आलेली त्यांची जबाबदारी, सामाजिक संस्थांना केलेले अॅम्ब्युलेन्स वाटप, तसेच राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या विविध ठिकाणी वैद्यकीय व आर्थिक मदत केली. तौक्ते वादळ घरांच्या पडझडीकरिता मदत, संगणक वाटप, महाड येथील तळई गावावर दरड कोसळल्यामुळे नविन गाव वसविताना नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, चिपळूण महापूर मध्ये सुद्धा ट्रस्टतर्फे वैद्यकीय व आर्थिक मदतीचा हात पक्षाने दिला. गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

राज्यात मोठ्या प्रमाणावर जिल्हा व तालुका पातळीवर जम्बो सेंटरची उभारणी केली रुग्णांकरिता ऑक्सिजन कमी पडू नये याची पूर्ण खबरदारी घेत वेळप्रसंगी ऑक्सीजन प्लांट उभारणी केली. ओ. बी. सी. आरक्षणसादर्भात इम्पिरिकल डाटा केंद्र सरकार कडे असूनही दिला नाही तरीही महाविकास आघाडी विरोधी जाणीवपूर्वक भाजपतर्फे अपप्रचार करण्यात येत आहे. महाविकास आघाडीने हा डाटा उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अशा प्रकारे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्याची माहिती दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles