Home गावगप्पा राज्यसभा निकाल: मविआ ३ व भाजपाचा ३ जागेवर कब्जा

राज्यसभा निकाल: मविआ ३ व भाजपाचा ३ जागेवर कब्जा

116

राज्यसभा निकाल: मविआ ३ व भाजपाचा ३ जागेवर कब्जा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: राज्यसभा निवडणुकीचा नाट्यमय घडामोडीनंतर अखेर शनिवारी पहाटे निकाल आला. राज्यातील सहा जागांपैकी भाजपने अनुक्रमे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा जिंकली. तत्पूर्वी, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दिवसभराच्या गदारोळानंतर संध्याकाळी मतमोजणी थांबवण्यात आली होती.

भाजप आणि महाविकास आघाडीने एकमेकांच्या मतदार आमदारावर आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत बैठक घेतली. तब्‍बल साडेआठ तास मतमोजणी रखडली होती. बैठकीनंतर आयोगाच्‍या निर्देशानूसार शिवसेनेच्‍या सुहास कांदे यांचे मत बाद ठरविले. त्‍यानंतर मतमोजणीस सुरुवात करण्‍याचे निर्देश दिले होते. मतमोजणी अखेर भाजपचे तीन उमेदवार तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. मविआचे 3 उमेदवार तर भाजपचे 3 उमेदवार जिंकले. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीमध्‍ये महाविकास आघाडीचे 3 उमेदवार तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.

मविआ कडून संजय राऊत, प्रफुल्‍ल पटेल आणि कॉंग्रेसचे इम्रान प्रतापगढी वियजी झाले आहेत. त्‍याचबरोबर भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. महाडिकांच्‍या विजयाचा जल्‍लोष अत्‍यंत प्रतिष्‍ठेच्‍या आणि चुरशीच्‍या समजल्‍या गेलेली सहावी जागा धनंजय महाडिकांनी संख्‍याबळापेक्षा अधिक मतांनी जिंकल्‍यानंतर महाडिक यांच्‍या घरी जल्‍लोष सुरु केला. महाडिक कुटुंबियांनी गुलालाची उधळण केली.

*कोणाला मिळाली किती मतं ?*
इम्रान प्रतापगढी – 44
प्रफुल्‍ल पटेल – 43
संजय राऊत – 41
अनिल बोंडे – 48
पियुष गोयल – 47
संजय पवार – 33
धनंजय महाडिक – 42

महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैध ठरवले आहे. दोन मतांवर आम्ही आक्षेप घेतला होता, मात्र कारवाई झाली नाही. आयोगाने त्यांची (भाजप) बाजू घेतली.