भारती महिला मंडळ चैत्रगौर समारंभास मोनिका मोहळांची उपस्थिती

भारती महिला मंडळ चैत्रगौर समारंभास मोनिका मोहळांची उपस्थिती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: देशभर लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना आणि प्रचाराचा धुमाकूळ शिगेला पोहचलेले असताना उन्हातान्हात फिरून उमेदवारांच्या पत्नी प्रचारात पुढे येऊन हिरिरीने उतरलेल्या दिसत आहेत. पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या पत्नी सौ. मोनिका मोहळ सुध्दा अशाच तापलेल्या उन्हात प्रचारात गुंतलेल्या असताना त्यांना कैरीचे थंडगार पन्हे आणि आंब्याची वाटली डाळ असा एक थंड शीतल आणि सुखद अनुभव घ्यायला मिळाला.

“भारती महिला मंडळा”च्या चैत्रगौर समारंभास सौ. मोनिका वहीनींना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या कुठलेही समारंभ म्हणजे मतदारांशी थेट संवाद आणि भेटीगाठीचा सुंदर योग असल्याने उमेदवार अशा कार्यक्रमांना आवर्जुन हजेरी लावतात. त्या अनुषंगाने “भारती महिला मंडळा”
च्या समारंभात उपस्थित महिलांशी मनमोकळा अनौपचारिक संवाद साधला. त्यांनी मुरलीधर मोहळ यांच्या आजवर केलेल्या कामांची माहिती दिली आणि मी आपल्या “पतीची प्रतिनिधी” म्हणून तुम्हाला भेटायला आले असल्याचे सांगितले.

“भारती महिला मंडळा”च्या वतीने माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी मोनिकाताईंचा सत्कार केला. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित असलेल्या उत्साही महिलांनी सौ.मोहोळ यांच्या समवेत डाळ पन्ह्याचा आनंद घेतला. मोनिका मोहोळ यांनी २०१२ ते २०१७ या टर्म मध्ये पुणे नगर पालिकेत नगरसेविका म्हणून धडाडीने काम केलेले असल्याने राजकीय क्षेत्रातील अनुभव आणि लोकसंपर्काची कला त्यांना अवगत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles