
आदित्यचं शुभमंगल होवो, सीतामाईसारखी सून लाभो; अनिल बोंडे
मुंबई: ‘चाचा से आगे निकला भतिजा’ अशा हास्यलहरी अयोध्यात ऐकू येत असतांना राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात डॉ. अनिल बोंडे यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे लवकरच शुभ मंगल होवो, आणि सीतामाई सारखीच सुनबाई आम्हाला मिळो. सुनबाई जर विदर्भातील असेल तर चांगले होईल, अशी प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना केली आहे, अशी खास वैदर्भीय प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली.
अयोध्येच्या दौऱ्यासाठी राजकीय नेतेमंडळींमध्ये चढाओढ लागलेली असतानाच महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याआधी बाजी मारली आहे. आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर गेले. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आदित्य ठाकरे यांचे अयोध्येत जोरदार स्वागत केले.
आदित्य ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्यावर आता राजकीय वर्तुळातून टीका होण्यास सुरवात झाली आहे. मनसे आणि भाजपाकडून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर टीका होत आहे. यावर खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी देखील जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात खासदार डॉ. अनिल बोंडे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.