शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : थडग्याची व्यथा☄*
*🍂शनिवार : २७ / ०४ /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*थडग्याची व्यथा*

राब राबून झिजला
देह कर्तव्याचा पथ
लेकरांच्या सुखासाठी
कधी थकले ना हात

बाप चंदन चंदन
माय सुखाची सावली
किलबिल गोकुळाची
अन्नपुर्णा नित नवेली

परिवर्तन नवे
काळाच्या गतीचे
प्रगतीसाठी जाणिले
मोल शिक्षणाचे

लेकरांच्या शिक्षणासाठी
अशी कसली कंबर
माती घामाने भिजली
मनी आकांक्षाचे बळ

केले कष्टाचे चीज
गाठले यशाचे शिखर
पण,डोळ्यातलं एकाकीपण
घालू लागले हुंकार

माता-पित्याचे अस्तित्व
लेक थडगे बांधतो
व्यवहारी कृतीचे
सोंग जगाला दावितो

वावरात विसावला
स्वाभिमानी तो माथा
मनी काहूर घेऊन
रुंदते थडग्याची व्यथा

*आशा कोवे-गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
*थडग्याची व्यथा*

कुठे चंदनाचा निघे धूर
कुठे जळती ओलीच लाकडे
गरीब श्रीमंत एकाच स्थळी
आत्माशांती साठी घालती साकडे

इथे राहायला नाही जागा
उघड्यावर संसार चाले
कीव येईना कुणाला
इथे माणसेच बेईमान झाले

कुठे दहन कुठे देई माती
थोरांची थडगे उभारली
काही सांगू त्यांची दुर्दशा
थडग्याची व्यथा ऐकली

जिवंत माणसे झाली थडगे
मरणानंतर प्रथेची भाकडकथा
पक्षी करती विष्ठा डोईवर
हीच आहे थडग्याची व्यथा

अरे संस्कार वर्ग चालवा
अंगीकारा थोरांचे गुण
कुठे चालली ही पिढी
कुठून शिकतात हे अवगुण

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
*थडग्याची व्यथा*

कोरोनाचं महामारी संकटं आलं
कोणी ईलाज करतांनाच संपलं
कोणी ऑक्सिजन अभावी गेलं
कोणी आजाराच्या धास्तीनं मेलं

काय सांगावी थडग्याची व्यथा
खूपच दयनीय अवस्था झाली
कसली अंत्ययात्रा न अंत्यदर्शन
लवकर जाळण्याची घाई झाली

बेवारस असल्यागत पडताहेत
स्मशानभूमीत प्रतिक्षेत जळण्या
जात,धर्म विसरून इथं सगळेच
एकाच ठिकाणावर अग्नि देण्या

अंत्ययात्रेला गर्दी करणारे पण
दुर दूर राहून पाहत राहू लागले
अंत्यसंस्काराचे क्रियाक्रम सारे
इथं भीतभित पार पडू लागले

माणसं एकमेका कुजबुजू लागले
स्मशानी अभा पाहून रडू लागले
जिवंतपणी रांगेत उभे राहायचे
मृत्यूपश्चात रांगेत शव पडू लागले

श्रीमंत,गरीब,नोकरदार,कामगार
स्मशानी कुठला भेदभाव नाही
मग जिवंतपणी का करावा गर्व
जाळल्यावर राखेत फरक नाही

*✍️बि. एस. गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
*थडग्याची व्यथा*

ज्यांची संपली जीवन यात्रा
घरी जमली नातलगाची जत्रा,
आप्तांचा शवा सोबत जथा,
स्मशानात पहा थडग्याची व्यथा,.

गरीब वा श्रीमंत देवाघरी सारखे,
मेल्यावर सारे होतात पारखे,
तेराव्या दिवशी तेरवीची प्रथा
स्मशानात पहा थडग्याची व्यथा,

कमाई करुन बांधली घरे,
श्रीमंत झालो म्हणते सारे,
शोकासाठी खेळतात पत्ता,
स्मशानात पहा थडग्याची व्यथा.

मुलाबाळासाठी संपती छापली,
नातेवाईक संपत्तीवर कोपली,
घरोघरी घडते पैशावरुन कथा,
स्मशानात पहा थडग्याची व्यथा.

पैशाआडक्यानी मोठा झाला,
जिकडे तिकडे प्रसिद्ध पावला,
दिवसागणिक वाढत गेली सत्ता,
स्मशानात पहा थडग्याची व्यथा.

स्मशानात बांधला नावाचा थडगा
नमस्कार करण्या येतो तेथे सगा,
पक्षी जनावरांचा जमतो जथा,
स्मशानात पहा थडग्याची व्यथा.

*भास्कर गायकवाड*
*चंद्रपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
*थडग्याची व्यथा*

जीवन भराची लेहून ठेवलेली गाथा
ऐका थडग्याची व्यथा बोला तो स्वतःशी

आस्थीतत्वाची लढाई आयुष्यभर
कधी संपलीच नाही माझी माझ्याशी

स्वतःच्या स्वार्थापाई दोन शब्द प्रेमाचे
निट बोललोच नाही कधी कोणाशी

सख्ये भाऊ पक्के वैरी झालो आम्ही
आयुष्यभर कधी बोललो नाही एकमेकाशी

विसरून गेलो रक्ताची नाती
लढत राहिलो शेतीच्या तुकड्याशी

मी व माझा अंहकार आज इथे
दफन झालो आहे या मातीशी

माझ माझ करता करता आयुष्य
हाळूच निघून गेल बंध तोडून श्वासाशी

या थडग्यात आता बंद झाले अस्थित्व
काही संबंध नाही राहीला जगाशी

ऐकली एकदा एका थडग्याची व्यथा
सांगू लागले ते आपली जीवनाची कथा

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
*थडग्याची व्यथा*

कधी बांधलेल्या जुनाट
थडग्याची व्यथा मांडली
इतिहास साक्षी ठेवूनिया
ओळख सर्वथा सांडली

जीवनी मिळाले नेत्रदीपक
यास खूप काही सुखावह
आता पदरात पडले काय
सौख्यमोल नाही, तर कलह

जुन्या आठवणी जाग्या
मनात नांदती सदोदित
थडगे बांधण्या खटाटोप
मिळाली संमती अनपेक्षित

थडगे बांधून तयार तरी
झाली परवड राजरोस
मशागत नाही नशिबात
मिळेना सवड भरघोस

थोर मोठ्या व्यक्ती अथवा
आहे उगीच दडपण मनी
आदरभावना काळजात
विरली अशी नाती जीवनी

स्मारक व्हावे वाटे आता
खरे भान आले प्रत्येकाला
जिवंत असता माणसाला
नाहीं दिला प्रेमाचा शेला

थडग्याची व्यथा कैक वेदनांची
मनात अविरत ठेवल्या दाबून
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
गेल्या काळजात जखमा राहून

*सचिन पाटील*
*अलिबाग रायगड*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles