थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८४ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८४ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर,पुणे प्रतिनिधी

पुणे: अजिंक्य योध्दा म्हणून इतिहासाच्या पानांवर ज्यांचे नाव कोरले गेले आहे असे महाप्रतापी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
यांचा २८ एप्रिल हा पुण्यस्मरण दिन. यंदा त्यांची ही २८४ वी पुण्यतिथी असून त्यिनिमित्त त्यांना समस्त पुणेकर व इतिहासप्रेमींच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे.

इतिहासाची पाने उलटताना दिसते की, नासिरजंगने नाईलाजाने तहामध्ये ठरले म्हणून हंडिया व खरगोण हे परगणे पेशव्यांना दिले. या परगण्यांची व्यवस्था लावण्यासाठी थोरले बाजीराव दि.३० मार्च रोजी खरगोण येथे गेले होते.. याच स्वारीत अचानक प्रकृती बिघडल्याने नर्मदा तीरावर खरगोण प्रांतात ‘ रावेरखेडी ‘ या गावी सोमवार दि.२८ एप्रिल १७४० रोजी, म्हणजेच तिथीनुसार रौद्रनाम संवत्सर , वैशाख शुध्द १३ शके १६६२ या दिवशी पहिल्या प्रहरी थोरले बाजीराव पेशवे यांचा अंत झाला, अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक व देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त जगन्नाथ लडकत यांनी दिली.

पुणे शहराने आजही या 300 वर्षापूर्वीच्या पराक्रमी पेशव्यांच्या वैभवी खुणा प्रेमाने जपल्या आहेत. शनिवार वाड्यावर भेट देणारांची आजच्या दिवशी मोठी गर्दी असते. पेशवाईतील या प्रतापसूर्याला आजच्या पुण्य स्मरण दिनी अभिवादनाचे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित केले जातात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles