
सहायक अभियंत्याविरूद्ध भाजी विक्रेत्याची पोलिसात तक्रार
_नियमबाह्य कारवाई केल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी_
गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी
नागपूर: हिंगणा तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर मिहान रोडची जागा सोडून सकाळी ५ ते दुपारी १२ पर्यंत कोरोना काळात कुटुंबातील उपजीविका भागविण्यासाठी ठोक भाजीपाला विक्रेते व्यवसाय करीत आहेत. ग्रामपंचायत रायपूर यांनी कोरोना नियमांची काळजी घेऊन व वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण न करण्याच्या सबबी खाली मौखिक परवानगी दिली आहे. याला जवळ जवळ आता दोन वर्षांचा कालावधी होत आहे. या व्यवसायामुळे कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास असल्याची तक्रार नाही.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सहायक अभियंता ( ना.म.प्र.वि.प्रा.-प.) यांचे कार्यालय पहिला माळा सांस्कृतिक संकुल, उत्तर अंबाझरी नागपूर -३३ यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम ,१९६६ चे कलम ५३ अंतर्गत २४ तासाचे आत अतिक्रमण काढण्याची नोटीस आम्हाला दि.०६/०५/२०२२ ला दिला. आम्ही तात्काळ त्याच दिवशी गैर अर्जदार यांचेकडे दि.०६/०५/२०२२ ला मा.विभागीय अधिकारी प. नागपूर, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण उत्तर अंबाझरी नागपूर यांना आमचे अतिक्रमण हटविण्याचे प्रयोजन काय ? प्रयोजना शिवाय, कायद्या नुसार अतिक्रमण हटविता येत नाही. आणि आमचे म्हणणे ऐकून घेतल्या शिवाय कारवाई करण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात आली होती.
परंतु आज दि.१५/०६/२०२२ पर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही आम्हाला असे माहीत आहे, की नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई ,३२ यांचे शुद्धी पत्रक ३ जुलै २०२० नुसार गावाचे गाव ठाण्याचे क्षेत्र वळगूनच विकास प्राधिकरणाला विकास कामे करण्याचे अधिकार आहे. आम्हाला कलम ५३ नुसार नोटीस दिली परंतु या कलमानुसार जमीन मालकानेच संबंधित गैर अर्जदाराला विकास कामा करीता जमीन उपलब्ध करून देणे आहे.
आमच्या जमिनीचे मालक तर ग्रामपंचायत रायपूर आहेत. त्यामुळे ग्राम पंचायत कार्यालयाने आमचेवर कारवाई करणे अपेक्षित होते. म्हणून आज दि.१५ /०६ २०२२ ला दुपारी ३ वाजता नंतर भाजीपाला खरेदी विक्री करणारे आपापल्या घरी गेले असताना बास बांधून थाटलेले दुकान आम्हाला कोणतीही संधी न देता आमचे दुकान उध्वस्त केले . यावरून गैर अर्जदार यांनी नियबाह्य व अधिकार नसताना बेकायदेशीर कारवाई केली आहे. त्यामुळे याबाबत गैर अर्जदारा विरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी. या आशयाची तक्रार हिंगणा पोलीस स्टेशनला भाजी विक्रेत्यान कडून दाखल केली आहे.