राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरा

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचा झंझावती दौरापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांची 18 जून रोजी नागपूरच्या धर्तीवर आगमन झाले. आगमन होताच सर्वप्रथम त्यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करून बाबा साहेब अमर रहे । कटारे साहेब आगे बढो । हम तुम्हारे साथ है । सकाळी 11 वाजता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन कटारे साहेबांच्या हस्ते करण्यात आले. लगेच दुपारी 2 वाजता बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सिद्धार्थ नगर टेका नाका येथील अभिनंदन सोहळ्यात उपस्थित राहून देशाची सध्याची स्थिती अत्यंत वाईट असून केंद्रात असलेल्या सरकारच्या प्रवक्त्या मुळे एका समुदायांच्या भगवान विरोधात व्यक्तव्य केले.

परिणामी जगाच्या 65 देशांनी भारताला माफी मागण्यात पर्यंत मजल गेली. भारताची इभ्रत गेली असे म्हणताच समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सरकार विरोधात उभे राहून एकसंघ भारताचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. आता जनतेने जागृत होण्याची गरज आहे. त्यांच्या या प्रभावी उदाहरण उद्भबोधना नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन चळवळीतील काम करून चळवळ जिवंत ठेवणाऱ्या थोर कार्यकर्त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यात प्रामुख्याने ग्रंथालय आणि रिपब्लिकन चळवळीचे एकनिष्ठ असलेल्या आदरणीय हरीदाजी टेंभर्णे Adv. सुरेश घाटे यांचा समावेश होता. यावेळी सुमारे 40 कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची भूमिका विशद करणारे आणि भावी काळात आंदोलन करण्याचा सातत्याने निवेदनातून पत्रकारांना सामोरे जाताना त्यांनी येत्या 14 ऑगस्ट 2022 ला जाहीर सभा आणि 15 ऑगस्टला संविधान सन्मान अभियानास प्रारंभ होणार असल्याचे वक्तव्य केले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना संविधान भारतीय संसदेने पारित केले व 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झाले. भारतातील सर्व नागरिकांनी समजून घेतले पाहिजे की, धर्म, जात, पंथ, त्वेष, आचार-विचार यात विविधता असलेल्या भारतीयांना अन्न-वस्त्र-निवारा व्यक्तीस्वातंत्र्य मूलभूत अधिकारांचा ग्रंथ म्हणजे सविधान अशा या ग्रंथाची संरक्षण करण्याचा संकल्प राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने यावेळी केला.

राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश अकोलकर, राष्ट्रीय महासचिव बाबुराव मेश्राम, विदर्भ प्रदेशाध्यक्ष शेषराव गणवीर, महासचिव पोपटराव सोनवणे, नागपूर जिल्हाध्यक्ष अशोक निमसरकार, संपर्क प्रमुख राजेंद्र भालेराव, जनसंपर्क प्रमुख सचिन नागरे, आणि प्रचार प्रमुख अनिल गायकवाड यावेळी उपस्थित होते तसेच मीडिया प्रभारी मा. भागवत लांडगे आणि देविदास रंगारी या पत्रपरिषदेला उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles