कंपनी मालकाची गुंडगिरी; कामगारांची केली फसवणूक


कंपनी मालकाची गुंडगिरी; कामगारांची केली फसवणूक

नाशिक: जिल्ह्यातील मुसळगाव तालुका सिन्नर येथील सत्य साई व इतर दोन कंपनीतील कामगारांनी एकत्र येऊन कंपनी मालक कमी पैशात कामगारांनी काम करा. व यासाठी संबंधित कागदावर सह्या द्या. तुमचे ट्रान्सफर केल्या जात आहे. पण परमनंट लेटर मध्ये म्हणले इथेच ठेऊ. असे सांगून मालकाने कामगारांची फसवणूक केली असल्याची बातमी पुढे आली आहे.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कामगारांनी 15 8 2021 रोजी दोन निवेदन अर्ज केले व त्या अर्जा मध्ये असे स्पष्ट केले. कामगारांनी सह्या देण्यासाठी मनाई केल्यास कंपनी मालकाकडून 10/ 9, 2021 रोजी दोनशे गुंड कंपनीत आणून संबंधित कामगारांना त्यांच्या मानेवर चाकू, बंदूक ठेऊन सह्या देण्यासाठी सक्ती केली व धमकावण्याचा प्रयत्न केला. त्या गुंडाजवळ चाकू, तलवार, बंदूक इत्यादींसारखे घातक हत्यार होती.

हे प्रकरण सर्व माहित पडताच. या घटनेची दखल घेत संगीता ताई राजाराम मुरकुटे पाटील शिव छा वा संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी हेमंत व राजेंद्र देशमुख यांना कॉल केला व तसेच घरी येऊन मुसळगाव या ठिकाणी जाऊन घटनेची दखल घेतली. काही काळ्या, पिवळ्या २० ते २५ गाड्या व दोन स्कार्पिओ गाड्या गुंडाच्या होत्या. गुंडांनी तोंडावर मास लावल्या कारणाने त्यांना ओळखता आलं नाही.आणि काही गाड्या सिन्नर ला बसस्टँड जवळ ही आढळून आल्याने तो सर्व प्रकार त्यांनी बघितला. जवळपास ४०० कामगारांच्या तसेच त्यांच्या अर्धागिनीच्या सह्या घेऊन ९ ते १० वेळेस प्रशासनाला विनंती अर्ज देण्यात आला.

२८ दिवस सिन्नर तहसील कार्यालय समोर उपोषणही केली तरी, प्रशासनाकडून कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. 25 4 2022 ला सर्व निवेदन देऊन व सर्व प्रशासनाला विनंती अर्ज देण्यात आले आहेत. येणाऱ्या ८ दिवसांमध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही तर, आम्ही पुन्हा एकदा न्याय मिळेपर्यंत उग्र सरुपाचे आंदोलन करू. असा इशारा सौ. संगीता ताई राजाराम मुरकुटे पाटील शिवछावा संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी दिला. किशोर केला व सत्या केला या कंपनी मालकावर कलम 141 143 144 145 147 149 150 160 कलम 323 कलम 324 504 506 352 व या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा. या प्रकरणाला नऊ ते दहा महिने होऊन गेले तरी सुद्धा आम्हाला कुठल्या प्रकारचा शासनाकडून प्रतिसाद नाही.

लवकरात लवकर प्रशासनाने आमचे प्रश्न सोडवावे. गृह खात्याने २०० गुंडाचा तपास घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच माझ्या मागे सतत चार फोर व्हीलर गाड्या असतात.माझ्या आणि माझ्या भावाच्या जीवाला धोका आहे. आम्हाला जर काही झालं तर संबंधित प्रकरणाला प्रशासन गृहखातं व किशोर केला व सत्य गेला हेच जबाबदार राहतील. असे त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles