भिवापूर येथे भाषा व गणित उद्बोधन कार्यशाळा संपन्न

भिवापूर येथे भाषा व गणित उद्बोधन कार्यशाळा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दिनांक 22/6/2022 ते 25/6/2022 या चार दिवसीय कार्यशाळेचं आयोजन गटसाधन केंद्र पंचायत समिती भिवापूर येथील सभागृहात करण्यात आले होते. कार्यशाळेला मा. श्रीमती भारती ताई पाटील सभापती शिक्षण व अर्थ समिती जिल्हा परिषद नागपूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा शिक्षकांशी संवाद साधून येत्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यशाळा मा.श्री. विजय कोकोडे,गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवापूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पार पडली. येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपण सर्वांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी स्वतःला झोकून देऊन काम करूया असे प्रेरणादायी आवाहन मा.कोकोडे सर यांनी केले.
या कार्यशाळेत भाषा व गणित पेटीतील साहित्य व विविध संबोध स्पष्ट करण्यासाठी कृतीआधारित अध्यापन पद्धती चा वापर करण्यावर भर देण्यात आला.

ही कार्यशाळा तालुक्यातील जि. प. शाळांतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेला सुलभक म्हणून श्री. मिलिंद मेश्राम ( साधनव्यक्ती ),श्री.संजय खोब्रागडे ( साधनव्यक्ती ), कु. मेघा गुरनुले ( साधनव्यक्ती ), कु. रीता नेवारे ( साधनव्यक्ती ),कु.किरण परेकार (साधनव्यक्ती), व कु. राधा ताकसांडे (साधनव्यक्ती) यांनी काम केले. कार्यशाळेत श्री. राजू नवनागे , श्री. कृष्णकांत भुरे, श्री. चव्हाण , श्री.राठोड , श्री. भगत, श्रीम. सोमकुवर, श्रीम. सोनकुसळे, श्रीम. जनबंधू , श्रीम.बोरकर तसेच इतर शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला.

सदर कार्यशाळा खूपच उपयुक्त होती अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिक्षकांमधून व्यक्त करण्यात आल्या.
कार्यशाळेला श्री दिलीप शहारे शिक्षण विस्तार अधिकारी, श्री. राजेश शेटे शिक्षण विस्तार अधिकारी , तालुक्यातील सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख ,सर्व समावेशित तज्ञ,सर्व विशेष शिक्षक यांची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles