
संगीत क्षेत्रातील आणखी एक तारा निखळला; गायक ‘केके’ अलविदा
बॉलिवूड सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुंनाथ यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी सिने इंडस्ट्रीतून येते. मुख्य म्हणजे केके यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले असून दरम्यान ते लाईव्ह कॉन्सर्टमध्ये होते. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांना त्वरित CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत काळाने घाला घातला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि स्वरांच्या दुनियेतील आणखी एक तारा निखळला.