अहिल्यादेवी होळकरांची जयंती ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न: राम शिंदे

अहिल्यादेवी होळकरांची जयंती ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न: राम शिंदे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अहमदनगर: जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर यांना निमंत्रित करण्यात आले नाही. गोपीचंद पडळकर यांनी चौंडीत रॅली आणली. ही रॅली चौंडीत दाखल होताच रॅलीचे रुपांतर सभेत झाले. या सभेत राम शिंदे व माजी मंत्री सदाभाऊ खोतही सहभागी झालेत. राम शिंदे यांनी शरद पवार (Sharad Pawar) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर, अहल्यादेवी होळकरांची जयंती ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केल्याची टीका केली.

राम शिंदे म्हणालेत “पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त मी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. मी तुमची मनापासून माफी मागतो. कारण मे महिन्याच्या उन्हात अहिल्यादेवींच्या जन्मदिनी रस्त्यावर बसावे लागले. मला तुमची व्यवस्था करता आली नाही. यासाठी बद्दल दिलगिरी व्यक्त करतो. वास्तविक, ही जयंती मागील अनेक वर्षे चौंडीमध्ये होते आहे.आतापर्यंतची जयंती सर्व समावेशक झाली. सर्वलोकांचा मानसन्मान आम्हाला ठेवता आला. आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व त्यांचा नातू रोहित पवार यांनी ही जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला चोख प्रतिउत्तर देण्यासाठी गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व एकत्र जमले आहेत.”

शरद पवार व रोहित पवार यांना उद्देशून ते म्हणालेत, तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो आम्ही सुसंस्कृत आहोत, संयमी आहोत, अहल्यादेवींचे अनुयायी आहोत, तुम्ही आमची परीक्षा पाहू नका. गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांना अडविण्यात आले तरी अहल्याभक्तांनी संयम ढळू दिला नाही.”

ते (पवार)फक्त येथे जयंतीच साजरी करायला आलेले नाहीत तर चौंडीतील ग्रामपंचायतची ८० एकर जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री होते. तुमच्या घरातील व्यक्ती चार वेळा उपमुख्यमंत्री आहेत. कधी चौंडीला जयंती केल्याचे ऐकीवात नाही, पाहण्यात नाही. आता का आले, कारण नातवाची काळजी आहे, असा आरोप राम शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर केला.

या जयंती कार्यक्रमासाठी कुणाला सांगितले नाही, कुणाला विश्वासात घेतले नाही. पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन ताब्यात ठेवले. त्याने प्रश्न सुटणार नाही. यांच्या बगलबच्च्यांनी नदीतील वाळू चोरली आहे. त्याची कुठे चौकशी झाली नाही. चौकशी झाली पाहिजे. नदीला पूर आला तर चौंडीला विळखा पडतो हा इतिहास आहे. पुराच्या पाण्याने मंदिर पडले तर याला जबाबदार कोण, याची चौकशी झाली पाहिजे. माझ्या घरी पोलिस अधिकारी एक तास बसून होते. पडळकर येत आहेत काय करायचे विचारले. त्यांना सांगितले, आधी जे केले तेच करा. माझ्याकडे येऊच नका. मीही जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यावेळी सर्वांना विश्वासात घेतले. ज्या अण्णासाहेब डांगे यांनी चौंडीत काम केले त्यांनाही विश्वासात घेतले नाही, असा आरोपही राम शिंदे यांनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles