देश जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक धोरण असावे; डॉ . अ .ल. देशमुख

देश जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक धोरण असावे; डॉ . अ .ल. देशमुख



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नाशिक: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP चर्चासत्राचे आयोजन नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जिल्हा परिषद नाशिक आयोजित कार्यक्रम तिडके कॉलनी येथील ग्रामसेवक भवन नाशिक येथे पार पडला.

जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम आहे.२०२० मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले असून,राज्य शासनाने या धोरणाचा स्विकार केलेला आहे.सध्या शासनाने गठीत मसूदा समिती साकारली आहे.उत्तम शैक्षणिक धोरणाच्या जोरावरच आपला देश जागतिक स्पर्धेत टिकेल असे तिडके कॉलनी येथील ग्रामसेवक भवन येथे नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यातर्फे प्रतिपादन शिक्षण तंज्ञ व राष्ट्रपती पदक विजेते डॉ.अ.ल.देशमुख यांनी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून राष्टूपती पुरस्कार प्राप्त डॉ.अ.ल.देशमुख मा.श्री.पंढरीनाथ थोरे अध्यक्ष व्ही.एन.नाईक शिक्षण प्रसारक संस्था,मा.श्री रामदास हराळ शिक्षणाधिकारी ( मध्य . )जि.प. नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थाचे शिक्षणाधिकारी डॉ . संजय शिंदे , यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी नवीन शैक्षणिक प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक रामदास हराळ ,क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.एस.के. शिंदे,जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के.सावंत, सचिव एस.बी.देशमुख,शहर कार्यवाह शरद गीते,सहकार्यवाह किशोर पालखेडकर, बी.के. नागरे आदि उपस्थित होते. डॉ.देशमुख म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणात बहुआयामी दृष्टीकोन व बहुविध बुद्धिमत्ता यावर भर दिलेला आहे.शिक्षणाच्या प्रवाहातील पहिला टप्पा महत्वाचा आहे.२०२५ पर्यंत देशातील सर्व विद्यार्थ्यांना वाचन लेखन आले पाहिजे असे ध्येय ठेवलेले आहे.

अंबलबजावणी नंतर बोर्डाच्या परीक्षा रद्द होणार आहेत,असे मसूद्यात कुठेही म्हंटलेले नाही उच्च माध्यमिक स्तरावर विषय बदलाची संधी असेल.एकूण २४ कौशल्याधिष्ठीत विषय उपलब्ध असतील.शाळा संकुल ग्रंथालयाचे महत्व त्यांनी विशद केले.
यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापक संघातर्फे शिक्षणाधिकारी श्री रामदास हराळ यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या.

सत्काराला उत्तर देतांना त्यांनी आपला जीवनपट व सेवेत केलेल्या कामाचे फळ व आनंद तसेच भावना व्यक्त केल्या. समारोपाच्या भाषणात मा.श्री पंढरीनाथ थोरे यांनी शिक्षण क्षेत्र,शैक्षणिक कार्यवाही, शिक्षक व मुख्याध्यापक यांचे योगदान नवीन शैक्षणिक धोरण, विद्यार्थी विकास,शिक्षकांच्या समस्या इ प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला.मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा.श्री.सावंत सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमा प्रसंगी भरत गांगुर्डे,दीपक ह्याळीज, एस.बी.पाटील,पी.के.धुळे,ए.के. खालकर,डॉ.अनिल माळी, डी.एस.ठाकरे, के.एस.आहेर, के.एम.मोरे तसेच मोठ्या प्रमाणात मुख्याध्यापक यावेळी उपस्थित उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles