सचिन वाझे होणार माफीचा साक्षीदार
_अनिल देशमुखांच्या अडचणीत होणार वाढ_
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलीय. सचिन वाझे आता माफीचा साक्षीदार होणार आहे. त्याचा अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत.
100 कोटी वसुली आरोप प्रकरणात सचिन वाझेंनी सीबीआयसमोर काही खळबळजनक खुलासे केले आहेत. यात देशमुख दबाव टाकत असल्याचा जबाब सचिन वाझेने सीबीआयला दिला आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.