कास्ट्राईब शिक्षक संघटनेशी श्याम तागडे यांची चर्चा

कास्ट्राईब शिक्षक संघटनेशी श्याम तागडे यांची चर्चा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया: कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा गोंदिया च्या वतीने मा. श्याम तागडे साहेब प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य तथा पालक सचिव यांच्या सोबत 1ली ते 8 वी तील इतर मागासप्रवर्गातील विद्यार्थी- विद्यार्थिनी, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना शिष्यवृत्ती मिळत असून त्याच धर्तीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील 1ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनी यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी संदर्भाने सकारात्मक चर्चा करण्यात आली.

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत चालू करण्यात यावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा सरळ सेवा भरतीतील अनुशेष लवकर भरण्यात यावा संबंधाने व इतर ही विषयांवर साहेबांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ते पाऊल उचलणार असल्याचे आश्वासन साहेबांनी कास्ट्राईबला दिले. या प्रसंगी साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वेळ दिल्याबद्दल साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटने चे जिल्हाध्यक्ष संजय उके, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा मुख्य संघटन सचिव हितेंद्र रामटेके ,गेडाम सर तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles