विधानपरिषदेचे नवनियुक्त १० आमदार आज करतील शपथग्रहण

विधानपरिषदेचे नवनियुक्त १० आमदार आज करतील शपथग्रहणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या १० सदस्यांचा शपथविधी व प्रतिज्ञाग्रहण समारंभ आज पार पडणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपने आपल्या संख्याबळापेक्षा एक जागा अधिक निवडून आणत पाच जणांना विधान परिषदेत पाठवलं. दुसरीकडे आवश्यक संख्याबळ असतानाही महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता.

महाविकास आघाडीनं विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती. तर, भाजपने प्रविण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे या पाच जणांना उमेदवारी दिली होती. एकूण ११ उमेदवारांपैकी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पक्षांतर्गत गटबाजीमुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. आज विधिमंडळात नवनिर्वाचित १० आमदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे.

भाजपकडून प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी, काँग्रेसचे अशोक ऊर्फ भाई जगताप हे १० सदस्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज शपथ घेतील. या सदस्यांचा शपथविधी, प्रतिज्ञाग्रहण समारंभ दुपारी १२.०० वाजता, मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles