Home ताज्या घटना सामाजिक न्याय विभागातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या बाईक रॅलीस १३ रोजी सुरुवात

सामाजिक न्याय विभागातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या बाईक रॅलीस १३ रोजी सुरुवात

118

सामाजिक न्याय विभागातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानास बाईक रॅलीस १३ रोजी सुरुवातपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

नागपूर: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्रय संग्रामातील अज्ञात नायक/क्रातिकारक/ स्वातंत्रय संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी. याच उद्देशाने सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमा अंतर्गत सामाजिक न्याय विभागातर्फे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर अंर्तगत येणाऱ्या सर्व आस्थापनामध्ये दि.13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान विविध कार्यक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथून ते संविधान चौक पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करून करण्यात आलेले आहे.

दि.13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर बाईक रॅलीस संबोधन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथून बाईक रॅलीचे सुरवात होऊन संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येईल. मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे व सर्वांनी उत्साहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा असे आवाहन डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले आहे.