राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवराम पाटील यांचे जाहीर आवाहन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवराम पाटील यांचे जाहीर आवाहन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- एकनाथ शिंदे आपण शिवसेना फोडून मुख्यमंत्री झाले. हा राजकारणाचा किंवा कट कारस्थानाचा भाग आहे. रोज पक्ष फोडण्याचा , जोडण्याचा तुम्हाला घटनात्मक अधिकार आहे.पण नैतीकता धरूनच. नैतिकता सोडली,फोडली तर मात्र तुम्ही घटनात्मक राजकारण करीत नाहीत. विधानसभेत एनकेन प्रकारे बहुमत मिळवले कि कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो.फक्त तुम्हीच नव्हे, दाऊद सुद्धा.अफगाण मधे तालिबान झालेच कि.पण नैतिकतेचा लवलेश नसेल तर आम्ही मराठी जनता मान्य करणार नाही.त्या वाटेने तुम्ही जाऊ नये.पण गेलेत, हा आमचा आक्षेप आहे. तुम्ही मिळवलेली सत्ता जास्त काळ टिकणार नाही. ,प्रयत्न केला तरी टिकणार नाही. कारण ती अभद्र आहे. अशुभ आहे.अनैतिक आहे.

मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतो. मंत्रीमंडळ बनवून कारभार चालवू शकतो.पण मंत्री हे त्या लायकीचे,पात्रतेचे,गुतवत्तेचे, चारित्र्याचे असले पाहिजे.असा विधिनिषेध तुम्ही पाळलेला नाही.अब्दुल सत्तार, संजय राठोड , गुलाबराव पाटील ही त्याची उदाहरणे आहेत.सत्तार आणि राठोड यांची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहेच.आणि तुम्ही आता सरकार बनवले आहे.त्यावर आम्ही अजून काही सांगण्याची गरज नाही.पण जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटील यांचे विषयी अपहाराची, अतिरिक्त संपत्ती माहिती सुद्धा सरकार दरबारी उपलब्ध आहे.आम्ही जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी अपहाराची माहिती आपणास समक्ष येऊन सांगितली आहे. तरीही आपण आठमुडे धोरण ठेवून गुलाबराव पाटील यांना मंत्री बनवलेच.आमच्या भेटीचा उलटा परिणाम झाला.जे गुलाबराव पाटील दुय्यम पसंतीवर होते, त्यांना तुम्ही प्रथम पसंती,पहिली संधी,पहिली शपथ दिली.आणि संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर नाराज झाला.कदाचित आम्ही दिलेल्या माहिती नुसार आपण गुलाबराव पाटील यांच्या अपहार करण्याची गुणवत्तेला जास्त महत्त्व दिले असावे.ती गुणवत्ता तुमच्या स्वभावा नुसार जास्त आवडत असावी.असा आमचा कयास आहे.नव्हे, तुम्हीच अनुभव दिलेला आहे.

विजयकुमार गावित हे जोशींच्या मंत्री मंडळात राज्यमंत्री झाले.नंदुरबार मधील कांग्रेस नेत्यांनी त्यांच्या भ्रष्टाचार विषयी तक्रार बाळासाहेब ठाकरे यांचेकडे केली.त्यांनी त्या गुणवत्तेची कदर करून त्यांना कैबिनेट मंत्री बनवले.गावीत यांनी या गुणवत्तेनुसार लक्षणिय प्राविण्य मिळवले.ते पाहून शरद पवारांनी गावीतांना आपल्या टिममधे खेचून घेतले.तेथेही त्यांनी डोळेफाड कामगिरी केली.एकनाथ खडसेंनी नरेंद्र मोदींना सांगून भाजपात खेचून घेतले.ऐसा आदमी हमारी टिम मे होना चाहिए. अशीच निवडक माणसे भाजप ने भरती केलीत.भाजप आता पार्टी वुईथ प्रिफरन्स चा दर्जा गमवून पार्टी वुईथ क्रिमीनल्स चा उच्च दर्जा मिळवून आहे. शिंदे साहेब, तुम्ही आता भाजपचे नेतृत्व मान्य केल्याने हाच क्रायटेरीया मंत्रीपदे वाटण्यात वापरलेला आहे.आमचा आक्षेप आहे कि, गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद दिलेच कसे? महाराष्ट्र स्वताची खाजगी जायदाद समजले कि काय ?

शिंदे सोहेब, तुम्ही एक एक चुका करीत आहातच.आता तरी सावधगिरी बाळगा.आधी गुलाबराव पाटील यांची चौकशी करू द्या.कोर्टाचा निकाल लागू द्या. इडीची कारवाई होऊन जाऊ द्या.जे काही चौकशी वगैरे होईल ,त्यात आम्ही सदस्य असणारच. तुम्ही परस्पर शेणावर माती ढकलणे आम्हाला मान्य नाही.चौकशी गुप्तपणे बंद कमरेमे नकोच.ती बलात्कार किंवा विनयभंगाची केस नाही.ती आहे अपहाराची. कोरोना काळात जळगाव जिल्ह्यातील २५९१ माणसे मेलीत.माणसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाचून तडफडून मरत होती.आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील ,ही सामुग्री न घेता निधीची परस्पर लयलूट करीत होते.तसे लिखीत स्वरुपात दस्तावेज आम्ही देतो.सिव्हील सर्जन देतील.प्रशासकिय अधिकारी देतील.तुम्ही तुमचे बुद्धीमान अधिकारी सोबत ठेवा. दोन चार वकील ठेवा.पण चौकशी तर मैदानावर करू.जळगांव जिल्ह्यातील जनेतेला कळू द्या कोरोना काळात माणसांच्या मृत्यू ला कोण जबाबदार आहे.महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा कळू द्या.असा माणूस आमचा मंत्री आहे.आणि तुम्हाला सुद्धा,असा माणूस मी मंत्री बनवला आहे.

मा.एकनाथराव शिंदे, तुम्हाला महाराष्ट्राचा कारभार करायचा आहे,जनतेच्या मनात स्थान मिळवायचे आहे,तर माझे आवाहन स्विकारले पाहिजे.मी एकटा नाही, संपूर्ण जळगाव जिल्हा आमच्या सोबत आहे.आणि कोरोना काळात तडफडून मेलेल्या माणसांची भुते सुद्धा. असे आव्हानच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना शिवराम पाटील यांनी दिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles