‘नागपुरात रूबरू ह्युमन लायब्ररी’चे २० ऑगस्ट रोजी उद्‌घाटन

‘नागपुरात रूबरू ह्युमन लायब्ररी’चे २० ऑगस्ट रोजी उद्‌घाटन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_२१ ऑगस्टला होणार पाच ‘ह्युमन बुक’चे वाचन_

नागपूर : जगभरात नावारूपास आलेली आणि भारतातील निवडक शहरांत सुरू असलेली ‘ह्युमन लायब्ररी’ ही संकल्पना नागपुरातही सुरू होत आहे. नागपूरच्या या ‘रूबरू ह्युमन लायब्ररी’चे उद्‌घाटन येत्या २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकरनगर येथे होत आहे.

‘रूबरू’च्या या उद्‌घाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया अय्यर या राहतील. ठाणे येथील ज्येष्ठ साहित्यिक विक्रम भागवत हे प्रमुख अतिथी राहतील. यावेळी एका बुकचा ‘ब्लर्ब’देखील सादर केला जाणार आहे.
उद्‌घाटन सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी, २१ ऑगस्ट रोजी तारकुंडे धरमपेठ माध्यमिक शाळा, उत्तर अंबाझरी मार्ग, अलंकार टॉकीजजवळ येथे पाच ह्युमन बुकचे वाचन होणार आहेत. दुपारी ३ वाजता ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत या बुक्सचे वाचन होईल.

यात व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सक्रिय असलेले तुषार नातू यांचे ‘… त्या दिवशी मी रॉकबॉटमला पोहोचलो’, एलजीबीटीक्यू समुदायासाठी झटणाऱ्या निकुंज जोशी यांचे ‘माझी लैंगिकता आणि मी’, बाइक रायडर आणि ट्रॅव्हलर स्नेहल वानखेडे यांचे ‘रास्ता… सफर और जिंदगी’, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या रुबिना पटेल यांचे ‘और मैने मेहेर माफ किया…’ आणि कॅन्सरच्या जनजागृतीसाठी सक्रिय असलेले रणजित उंदरे यांचे ‘त्याने जिंकले कॅन्सरचे रण’ हे ह्युमन बुक सदस्यांसाठी सादर होणार आहे.

*ह्युमन लायब्ररीच्या संकल्पनेविषयी…*

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा कालावधी, प्रसंग, संघर्ष, त्याने केलेली वाटचाल किंवा त्याचे संपूर्ण आयुष्यच एखाद्या पुस्तकाप्रमाणे त्याने एखाद्या तटस्थ निवेदनाप्रमाणे सांगणे व ते ऐकताना उपस्थितांनी त्या विषयाबाबतची आपली आधीची पूर्वग्रहदूषित मते बदलून नव्या दृष्टिकोनांचा अंगीकार करीत स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला अधिक प्रगल्भ बनवणे, हा आहे ह्युमन लायब्ररी या संकल्पनेचा मूळ गाभा. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, ह्युमन लायब्ररी म्हणजे, एखाद्या व्यक्तीने पुस्तक होऊन स्वत:च्या आयुष्यातील एखादी घटना, अनुभव, वाटचाल, संघर्ष कथन करणे. त्यातून आलेले आकलन आणि बदललेले आयुष्य याविषयी मनोगत व्यक्त करणे होय. विशेष म्हणजे, यावेळी उपस्थितांना पुस्तकांना प्रश्नही विचारता येणार आहे.

*ह्युमन लायब्ररीच्या प्रारंभाविषयी…*

पहिली मानवी लायब्ररी उघडली ती डेन्मार्कमध्ये. माणसांची लायब्ररी ही रॉनी एबरगेल, त्याचा भाऊ डॅनी आणि काही सहकाऱ्यांनी मिळून कोपेनहेगेन नावाच्या शहरात सुरू केली.

हिंसाचारासंबंधी जनजागृती करणे हा त्या ह्युमन लायब्ररीचा मुख्य उद्देश होता. एका नावाजलेल्या डॅनिश फेस्टिव्हलमध्ये ही विलक्षण लायब्ररी सलग चार दिवस सक्रिय होती आणि पहिल्याच प्रयत्नात या लायब्ररीला जवळजवळ हजार वाचकांनी भेट दिली. तिथूनच या अभिनव कल्पनेची सुरुवात झाली आणि बघता बघता सहा खंडांत आणि ऐंशीहून अधिक देशांमध्ये ही लायब्ररी पोहोचली. भारतात पहिली ह्युमन लायब्ररी सुरू झाली ती इंदूरमध्ये. नंतरच्या काळात दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद येथेही ती सुरू करण्यात आली आणि आता नागपूरमध्ये सुरू होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles