Home गावगप्पा स्व. देवकीबाई बंग शाळेत दहीहंडी उत्सव

स्व. देवकीबाई बंग शाळेत दहीहंडी उत्सव

88

स्व. देवकीबाई बंग शाळेत दहीहंडी उत्सवपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपालकाला निमित्त स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे दहीहंडी कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात नर्सरी ते चौथ्या वर्गा पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी राधा – कृष्ण अशा विविध वेशभूषेत कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका अरुणाताई बंग, होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर हे होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सीमा पारसे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.