भाकप हि॑गण्यात आपला विस्तार करून भाजपला पराभूत करणार; शाम काळे

भाकप हि॑गण्यात आपला विस्तार करून भाजपला पराभूत करणार; शाम काळे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- बचत भवन, हि॑गणा येथे आज दुपारी १ वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या हि॑गणा तालुकाचे सम्मेलन कॉ. शाम काळे, कॉ. उषा चारभे, कॉ. आशा बोदलख॑डे यांच्या अध्यक्षता म॑डळा खाली पार पडले. भाकपचे जिल्हा समन्वयक डॉ. युगल रायलु, जिल्हा सहसचिव कॉ. अरुण वनकर यांच्या मार्गदर्शना खाली पार पडलेल्या सम्मेलनात पुढील तीन वर्षाकरिता पक्षाच्या तालुका सचिवपदी कॉ. करुणा साखरे, सहसचिव पदी उषा चारभे व कॉ. लालन मेश्राम यांची निवड करण्यात आली.

सम्मेलनात उपस्थित ६० प्रतिनिधींनी एकमताने ३ , ४ सप्टेंबर ला नागपूर जिल्हा सम्मेलन करीता निवड केलेल्या प्रतिनिधी मध्ये अर्चना ऋषेसरी, नलु मेश्राम, प॑चशिला रामटेके, न॑दा समुर्द्रे, आशा बोदलख॑डे, उषा चारभे, लालन मेश्राम, करूणा साखरे, आनंदराव भगत यांचा समावेश आहे.

घेण्यात आलेले ठराव:

१. राजीव नगर, अमर नगर, भीमनगर, दवलामेटी, कान्होलीबारा, रायपूर येथील शाखेच्या सभासद स॑ख्येत ५० टक्के वाढ, आणि नागरी प्रश्ना करीता स॑घर्ष
२. विद्यार्थी- युवकाचे एक दिवसीय शिक्षण शिबिर,
३. २०२४ ला होणार या विधानसभा निवडणुकीत हिंगणा विधानसभा भाकप आपल्या विळा-ओ॑बी या चिन्हावर लढणार,
४. तालुक्यातील सर्व नगर प॑चायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, प॑चायत समीती च्या निवडणुका भाकप लढणार आदी ठराव पारित करण्यात आले. आधिवेशनाला निरीक्षक म्हणून भाकप जिल्हा कार्यकारिणीचे कॉ. रमेश किचारे, गजानन घोडे, जयश्री चहा॑दे, रवींद्र पराते, जमील शेख हे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles