धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार

धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यस्थिती निमित्य विद्यार्थी करीता शैक्षणिक व व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन , समुपदेशन व गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच नवनियुक्त कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार घेण्यात आला.

नागपूर जिल्हा मध्ये सन २०२२ मध्ये दहावी,बारावीत ७५ टक्के व पदवीत ६० टक्के च्या वर गुण असलेल्या विद्यार्थ्यां करीता शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा व करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, नवनियुक्त कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार सोहळा रविवार दिनांक २१/०८/२०२२ ला श्री संत गजानन महाराज मंदिर, बालाजी नगर विस्तार, वेणू कॉर्नर रेस्टॉरंट जवळ, मानेवाडा रोड नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता.

कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्याच्या हस्ते दिप प्रज्वलन करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, स्मरणिका, फोल्डर देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. धर्मेंद्र बुधे जिल्हाध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना, नागपूर जिल्हा यांनी केले, त्यानंतर गजानन राजमाने उपयुक्त, परिमंडळ-३ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, नंतर ऍड मनजीत कौर मतानी (हायकोर्ट वकील तथा यूपीएससी मार्गदर्शक) यांनी यूपीएससी, एमपीएससी परीक्षा वर मार्गदर्शन केले,नंतर श्रीमती स्नेहलताई ढोके (इंडीयन ट्रेंड सर्व्हिस) यूपीएससी, एमपीएससी परीक्षा वर मार्गदर्शन केले,तसेच डॉक्टर प्रफुल ढेवले (हृदयरोगतज्ञ) यांनी वैद्यकीय शिक्षण- संधी व प्रवेशप्रक्रिया यावर मार्गदर्शन केले, नंतर डॉक्टर विवेक कुहीटे (मधुमेह व थायरॉईड तज्ञ), यांनी वैद्यकीय शिक्षण- संधी व प्रवेशप्रक्रिया यावर मार्गदर्शन केले, तसेच अनिरुद्ध जोशी (ब्रिटिश कौन्सिल) यांनी स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी विषयावर मार्गदर्शन केले,नंतर श्री. नरेंद्र कडवे संगीत, साहित्य व कला विषयातील संधी यावर मार्गदर्शन केले, मोहन भेलकर (करिअर कौन्सिलर) स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थी करिअर यावर मार्गदर्शन केले, श्री. शेखर पुनसे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक विविध प्रमाणपत्राची माहिती दिली, श्रीमती सुजाता गावंडे नायब तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, डॉक्टर रवी पुंडलिक ढवळे मानसिक रोग व व्यसनमुक्ती तज्ञ यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या, तसेच डॉक्टर दीपक कापडे संचालक, ज्ञान स्रोत केंद्र क. कु. का. संस्कृत विद्यापीठ यांनी संघटनेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सरकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे सर्वांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्य अतिथी डॉक्टर रमेश ढवळे डीन (अकेडेमिक आर. डी गारडी, मेडिकल कॉलेज उज्जैन(म.प्र.) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर हरिभाऊ कानडे (माजी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात चे अध्यक्ष श्री.अनिलकुमार ढोले साहेब राज्याध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शन केले, नाविन्यपूर्ण कार्यक्रम सतत करन्याचा संघटनेचा प्रयत्न असुन त्या करीता समाजाने सुचना करावे असे आवाहन करून, संघटनेचे सभासद होन्याचे आवाहन करून, कार्यक्रमात उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले, तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी पालक आणि संघटनेचे पदाधिकारी व सदस्य याचे आभार मानले.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी सत्र २०२२ मध्ये १० वी ला ७५% वर असणारे विद्यार्थी ५५ तर १२ वी ला ४५ विद्यार्थी , तसेच पदवीधर ३५ विद्यार्थी , क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे २ विद्यार्थी असे संपूर्ण १३७ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला , तसेच सेवानिवृत्त कर्मचारी १७ चा शॉल श्रीफळ सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता.आणि नवनियुक्त कर्मचारी २ व्यक्तीचा सत्कार करण्यात आला होता.कार्यक्रमाला ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी, पालक व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर महाराष्ट्र राज्य च्या सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व सदस्य यांनी प्रयत्न केले .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles