इंद्रकुमार मेघवाल प्रकरणी बसपाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले

इंद्रकुमार मेघवाल प्रकरणी बसपाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर :- राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सुराणा गावच्या सरस्वती विद्या मंदिरात तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या इंद्रकुमार मेघवाल या नव वर्षीय दलित बालकाला त्या शाळेचे मुख्याध्यापक व संचालक छेलसिंग भोमिया राजपूत याने दलित असूनही माझ्या पाण्याच्या मटक्याला हात का लावला ? या कारणा वरून बेदम मारहाण केल्याने १५ आगस्ट रोजी त्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार्यवाही साठी बसपाने नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना आज निवेदन दिले.

बसपा ने दिलेल्या निवेदनात
१) इंद्रकुमार मेघवाल प्रकरणाची सीबीआय चौकशी करणे,
२) मेघवाल परिवाराला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देणे,
३) मृतक इंद्रकुमार देवाराम ह्यांच्या परिवारांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे,
४) प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून एक वर्षाच्या आत मध्ये त्याचा निकाल लावणे,
५) जातीयवादी छेलसिंग याला अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतीबांधक कायद्या अंतर्गत फाशीची शिक्षा देणे, तो
६) मुख्याध्यापक व संचालक असलेल्या त्याच्या सरस्वती विद्यालयाची मान्यता रद्द करणे, आदी मागण्या याप्रसंगी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

निवेदन बसपाचे प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, विजयकुमार डहाट, उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, महिला नेत्या प्रीती बोदेले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. निवेदन राष्ट्रपती व प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या नावाने पाठविण्यात आले. निवेदनापूर्वी बसपा नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुष्पगुच्च देऊन त्यांचे नागपूर आगमनासाठी स्वागत केले.

याप्रसंगी चंद्रशेखर कांबळे, तपेश पाटील, बुद्धम राऊत, नालंदा पझारे, सुरेखा डोंगरे, वैशाली गणवीर, सुनंदा नितनवरे, नगरसेवक इब्राहिम टेलर, महेश वासनिक, प्रेमलाल कुवर, सावलदास गजभिये, अनिल मेश्राम, अविनाश नारनवरे, अभिलेश वाहने, राजकुमार बोरकर, चंद्रसेन पाटील, गोपाल मेश्राम, प्रवीण पाटील, यादव भगत, मॅक्स बोधी, नारायने आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles