स्टार्ट अप” यात्रेचे जे.एस.एम. कॉलेजमध्ये आगमन

स्टार्ट अप” यात्रेचे जे.एस.एम. कॉलेजमध्ये आगमन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_विद्यार्थ्यांना देण्यात आले नाविन्यपूर्ण उद्योजकतेचे मार्गदर्शन_

अलिबाग: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे एका ‘स्टार्ट अप’ यात्रेची सुरुवात झाली असून आज या यात्रेचे आगमन अलिबाग येथील जे.एस.एम. कॉलेजमध्ये झाले.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अॅड. गौतम पाटील यांनी सदर यात्रेचे महाविद्यालयात स्वागत केले. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी व नाविन्यपूर्ण उद्योजकता प्रकल्पांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे एक स्पर्धा घेतली जात असून याविषयीची सर्व माहिती स्टार्ट अप यात्रेतील रथावरील व्हिडिओमधून देण्यात आली. तसेच स्टार्टअप यात्रेतील प्रमुख मार्गदर्शक व उपक्रम प्रतिनिधी श्री. प्रद्युम्न आढाव यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून, दिनांक 3 सप्टेंबर 2022 पर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येईल.
यावेळी जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगडच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना “आपल्या नाविन्यपूर्ण योजनांचा विकास करण्याची ही एक संधी असल्याने, या स्पर्धेत जरूर सहभागी व्हा” असे आवाहन केले.

महाराष्ट्र शासनातर्फे विद्यार्थी व तरुणांना नाविन्यपूर्ण उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध झाल्यास नवीन मराठी उद्योजक तयार होण्यास पुढे येतील. त्या दृष्टीने स्टार्टप यात्रेचे आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे अॅड. गौतम पाटील अध्यक्ष , जनता शिक्षण मंडळ यांनी सांगितले.

महाविद्यालयाच्या ‘स्टार्ट अप’ कमिटीचे सदस्य डॉ. एस. ए. कानडे यांनी आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. प्रीती फाटे, डॉ. मीनल पाटील, प्रा. श्वेता पाटील, प्रा. समृद्धी पाटील, प्रा. मंजुषा पाटील, प्रा. श्वेता मोकल, प्रा. अश्विनी दळवी व श्री. वरुण पाटील आदी प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles