‘शोले’च्या नायकाचा चित्रपट बघायला पैसे नसलेले ‘नागराज’ करतात बीग बी सोबत काम

‘शोले’च्या नायकाचा चित्रपट बघायला पैसे नसलेले ‘नागराज’ करतात बीग बी सोबत काम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागराज मंजुळे यांना वाढदिवसानिमित्त ‘बिनधास्त’ शुभेच्छा

नागपूर: संत्रानगरीच्या वैभवात झुंडच्या अप्रतिम कलाकृतीने मानाचा तुरा रोवणारे फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड आदी दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून समाजातील वंचितांचे प्रश्न समोर आणणारे त्यावर सडेतोडपणे भाष्य करणारे एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणजे नागराज पोपटराव मंजुळे. आज २४ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस. नागराज यांनी चित्रपट विश्वात स्वतःचे नावच केले नाही तर एक इतिहास घडवला. असा इतिहास ज्याला आजवर कुणी धक्का लावू शकलं नाही.

अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून नागराज इथवर पोहोचले आहेत. एकेकडे ‘शोले’ चित्रपटाचे दिवाने असलेले नागराज आपणही कधीतरी ‘जय’ होऊ असं स्वप्न पाहत होते. पण नियतीने अनेक अडथळे त्यांच्या वाटेवर आणले. पण त्यावरही मात करून ते पुढे गेले आणि शोले मध्ये ‘जय’ची भूमिका साकारणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत आज ते चित्रपट करत आहे. त्यांच्या यशातील हा महत्वाचा आणि गमतीशीर टप्पा जाणून घेऊया त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने..

अमिताभ आणि नागराज यांचं एक खास नातं आहे. नागराज हे लहानपणापासूनच अमिताभ यांचे मोठे चाहते होते. त्यांचा प्रचंड प्रभाव नागराज यांच्यावर होता. याच आठवणी त्यांनी एका मुलाखतीत सांगितल्या होत्या. नागराज म्हणाले होते,’अमिताभ बच्चन यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता; किंबहुना तो आजही आहे. मी लहान असताना त्यांच्यासारखी शर्टाला खाली गाठ मारून गावभर फिरायचो. शाळेतही खाकी पँट घालायचो आणि पांढऱ्या शर्टला गाठ मारायचो. शिक्षकांचा मार खायचो; त्यांच्यासमोर ती शर्टाची गाठ सोडायचो. पण, त्यांनी पाठ फिरवल्यावर पुन्हा गाठ मारायचो. लहानपणी त्यांचे सिनेमे पाहण्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे. कसेबसे पैसे जमवून मी त्यांचे सिनेमे पाहायला जायचो. ‘शोले’ सिनेमाच्या संवादांची कॅसेट मी वारंवार ऐकत बसायचो आणि तसाच सीन बसवायचा प्रयत्न करायचो. ‘शोले’हा चित्रपट आमच्यासाठी एक खेळ होता. माझ्या एका मित्राची गाढवं होती. आम्ही ती गाढवं पकडून आणायचो आणि त्यांना घोडे समजून ‘शोले’चा सीन उभा करायचो. खरं तर मला तेव्हा ‘जय’ व्हायचं असायचं. पण, गाढवं आपली नसल्यानं मला सांबा, कालिया व्हायला लागायचं.’

नागराज म्हणातात,’ मी त्यांना २०१६च्या सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा भेटलो. ‘झुंड’ सिनेमाची गोष्ट ऐकवण्यासाठीची ती भेट होती. ‘मी तुमचा फॅन आहे…’ हे शब्द बच्चन साहेबांसाठी काही नवे नाहीत. भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांना हे म्हणतच असणार. कलाविश्वातील त्यांच्या अनुभवाइतकं माझं वयही नाही. पण, आमची ही मी भेट एक चाहता आणि कलाकार म्हणून नव्हती. मी एक दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे गेले होतो. कारण, माझ्या हातात मर्यादित वेळ होता. साधारण अर्धा तास. पण, या अर्धा तासाच्या भेटीनं कधी तास उलटला हे कोणालाही समजलं नाही. अमितजींनी ‘सैराट’ पहिला होता; असं ते तेव्हा मला म्हणाले. ‘झुंड’ची गोष्ट ऐकून त्यांनी लगेच होकार दिला नाही.

‘पूर्ण सिनेमा लिही’, असं ते तेव्हा म्हणाले. या भेटीनंतर काही महिन्यांनी आम्ही पुन्हा भेटलो. तेव्हा मी सिनेमाचा पहिला ड्राफ्ट वाचून दाखवला. त्यांना तो आवडल्यानंतर मी माझ्या मनातील त्यांच्याविषयीच्या भावना सांगितल्या. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा फोटो काढला. मी सुरुवातीलाच चाहता म्हणून अडकून गेलो असतो तर मी माझ्या लेखक-दिग्दर्शकीय भूमिकेला न्याय देऊ शकलो नसतो. माझं काम त्यांना आवडावं हीच माझी पहिली अपेक्षा होती,’ अशी रम्य आठवण नागराज यांनी सांगितली.

सौजन्य: सकाळ माध्यम

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles