
आ.प्रशांत बंबांच्या बेजबाबदार विधान व मागणीच्या जाहीर निषेधार्थ घोषणा
_चलो समुद्रपूर.. पं.स.कार्यालय परीसर,समुद्रपूर_
वर्धा: राज्यात महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनात दि.23 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत, कंदिलशून्य बुद्धीचा नमुना पेश करीत, तळागाळात काम करणारे शिक्षक, ग्रामसेवक कर्मचारी यांच्या विरोधात मुख्यालयी राहण्याचा अवाजवी प्रश्न निर्माण करुन केलेल्या बेजबाबदार विधानाचा जाहीर निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दि २५ ऑगस्ट रोजी दुपारी २.०० वा पंचायत समिती कार्यालय, समुद्रपूर येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत आमदार महाशयांचा सोशल मिडियावर अनेकांनी समाचार घेत निषेधही केला. परंतु अशी विचारसरणी पुन्हा प्रबळ होऊ नये, तळागाळात काम करणारे कर्मचारी समुदायांच्या अस्मिता व स्वाभिमानाशी यांनी पोरखेळ करु नये यासाठी कृतीतून प्रत्यक्ष निषेध नोंदविणे आवश्यक आहे. तसेच शासन दरबारी संतप्त निषेधाचे निवेदन पाठविणे गरजचे असल्याने, आयोजित निषेध सभेत आपल्या तालुक्यातील ग्रामसेवक तसेच शिक्षक बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा घेऊन निषेध करण्यास प्रत्यक्ष उपस्थित राहावे. असे आवाहन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने अजय गावंडे (विभाग प्रमुख), वसंत कापटे (जिल्हा उपाध्यक्ष), प्रेम भोजनकर (ता.अध्यक्ष,समुद्रपूर) तसेच संघटनेच्या सर्व पदाधिका-यांनी केले आहे.