
शिवतेज मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
कुडूत्री(प्रतिनिधी)
कोल्हापूर: शिवतेज तरुण मंडळ (ता. राधानगरी) यांचे वतीने गणेश उत्सवानिमित्त शनिवार दिं ३ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन केले आहे.या स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात होणार आहेत.
लहान गट(५ वी ते ७ वी)असा असून या गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, १००१,७०१,५०१,अशी बक्षिसे राहणार आहेत. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर चतुर्थ क्रमांकासाठी ३५१ व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.लहान गटासाठी या गटासाठी विषय पुढील प्रमाणे १)महाराष्ट्र भूमी संतांची भूमी २) माझा आवडता क्रांतिकारक ३) हसरे घर ४)वाढती महागाई असे विषय ठेवण्यात आले आहेत.
मोठा गट (८ ते १० वी) या गटासाठी प्रथम तीन क्रमांकाना १५०१,१००१,७०१ रुपये, शील्ड प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तर चतुर्थ क्रमांकाला ५०१ व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या गटासाठी १) रम्य ते बालपण २) लोकराजा राजर्षी शाहू महाराज ३) युद्ध नको शांती हवी ४)बळीराजाचा बळी जातोय असे विषय ठेवण्यात आले आहेत.
*या स्पर्धेसाठी पुढील नियम व अटी*
१)लहान गटासाठी पाच मिनिटे तर मोठ्या गटासाठी सहा मिनिटे असा वेळ राहील.२) नाव नोंदणीसाठी स्पर्धकाला शाळेचे बोनाफाईड आणणे आवश्यक आहे.३) स्पर्धेचे माध्यम मराठी भाषा असेल.४) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.५) काही नियम मंडळाकडे राखीव आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश फी २१ रुपये राहील