‘पन्नास खोके एकदम ओक्के; इळा पिळा घेऊन जागे मारबत…!!

‘पन्नास खोके एकदम ओक्के; इळा पिळा घेऊन जागे मारबत…!!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अमरावतीमध्ये पीपीई किट घातलेल्या मारबतचे विसर्जन_

नागपूर/ अमरावती: विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजला जाणारा परंपरागत तान्हा पोळा निमित्त नागपुरात बडग्या व मारबतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. नागपूरने शेकडो वर्षांपासून जपलेल्या बडग्या-मारबत परंपरेमुळे नागपूरला वेगळी ओळख मिळाली. दरवर्षी तान्हा पोळ्याच्या (लाकडी बैलांचा पोळा) दिवशी मिरवणूक काढली जाते. त्यात सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे पुतळ्यांचे देखावे (बडगे) तयार केले जातात. मिरवणुकीच्या समारोपाला त्याचे दहन केले जाते. जुन्या नागपुरातून निघणाऱ्या या मिरवणुकीत लाखो नागपूरकरांसह विदर्भातील नागरिक सहभागी होतात. ती एक जत्राच असते.याच जत्रेचा उत्साह आज संपूर्ण शहरात ओसंडून वाहात होता.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर रायपुरा येथील युवा गणेश मंडळाच्या वतीने पीपीई किट घातलेल्या मार्बतला कोरोना घेऊन जा गे म्हणत विसर्जन करण्यात आले. यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी मारबत काढण्यात आली. इळा पिळा घेऊन जागे मारबत….. रोग राई घेऊन जागे मारबत….म्हणत मारबत माताला साकडं घालण्यात आले. मारबत मिरवणुकीवर यंदा विविध भ्रष्ट मंत्र्यांच्या बडग्यांसह महागाई, रस्त्यांवरील खड्डे आणि कोरोणा, डेल्टा प्लस इतरही समस्यांचा प्रभाव दिसून आला. शिवाय, स्वदेशी बचाव विदेशी हटावो, प्रदूषण आणि रोगमुक्त शहरासाठी आदी विषयांवर पोस्टर तयार करण्यात आले होते.

समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने तान्हा पोळ्याच्या दिवशी ही मिरवणूक काढण्यात येते.अचलपूर येथील श्री युवा गणेश मंडळ व इतर तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसादात दरवर्षी मारबत मिरवणूक काढण्यात येते यंदा शेतीतील टाकाऊ साहित्यांचा कल्पकपणे वापर करून सहा फुटांची मार्बत तयार करण्यात आली होती. आखीवरेखीव चेहरा, साज शृंगार केलेली मारबतची मिरवणूक शहरातून निघाली. शेवटी ऐतिहासिक लालपुर येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी समाजातील रोगराई घेऊन जा इडा पीढा घेऊन जा म्हणत मारबत माताचे विसर्जन करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles