प्रियदर्शनी स्कूल मध्ये चिमुकल्यांचा पोळा साजरा
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- प्रियदर्शनी स्कूल वानाडोंगरी महाजनवाडी शिवाजी पार्कच्या प्रांगणात पिठोरी बैल पोळ्या निमित्त लहान चिमुकल्याचा पोळा भरवण्यात आला. त्या क्षणी शाळेचे संचालक श्री.धर्मेंद्र कोहाड सर शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या हलमारे मॅडम तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सौ. प्रिती कोहाड मॅडम यांनी प्रथम सरस्वतीच्या फोटोला माल्यांपर्ण करून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विध्यार्थी मित्रांन कडून शेतकरी डान्स सादर करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम यांनी शेती आणि शेतकरी यावर खूप छान मार्गदर्शन केले नंतर ज्यांनी छान नंदी सजवून आणला आणि शेतकऱ्यांच्या वेशभूषेत नटून आलेल्या शेतकरी व शेतकरीन यांना योग्य पारितोषिक देण्यात आले. आणि प्रिती कोहाड मॅडम यांनी अन्न पिकवणारा शेतकरी यांवर खूप छान माहिती सांगितली.श्री. धर्मेंद्र कोहाड सरांनी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता ‘जय जवान जय किसान’ या घोषणेने करण्यात आली.