श्रीसंत गमाजी महाराज समाधी दिन सोहळा रविवारी

श्रीसंत गमाजी महाराज समाधी दिन सोहळा रविवारी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- हिंगणा येथून दोन मैल अंतरावर किन्ही धानोली अन्नपूर्णा नदीवर वसलेले गाव आहेत. या गावात श्री. संत गमाजी महाराजांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वासुदेव व आईचे नाव देवकाबाई होते. देवकाबाईला गमाजी हे एकुलते एक चिरंजीव होते. त्याचा जन्म शुक्रवारला झाला. भविष्यकारांनी वासुदेवाच्या मुलाचे नाव गमाजी ठेवले. त्याचे भविष्य वर्तविले त्यात असे दिसून आले की, हे मूल अवतारी पुरुष म्हणून जन्माला आलेले आहे.

वासुदेवाचे गरीबी जीवन फारच कठीण परिस्थितीत गेले. गमाजी १७ , १८ वर्षाचे झाले तेव्हा किन्हीचे पाटील कोडबाजी निघोट यांच्या गाई म्हशी चारायला नोकर राहिले. गाई म्हशी पडित शेतात चरत असत व गमाजी ईश्वर चिंतनात मग्न राहत असत.पडित शेता जवळ लागुनच पाटलाची वाडी होती. त्या वाडीत कोहळे लावले होते.एके दिवशी त्या वाडीत चुकून गायी म्हशी गेल्या. जनावरेच ती जिकडे तिकडे हिरविगार शेतात कोहळयाच्या वेली तुडवून टाकल्या. वेलीची नासाडी केली हि बातमी कोणीतरी पाटलास सागितली. पाटील फार गर्विष्ट स्वभावाचे होते.

सकाळी वाडीत जाऊन पाहाताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्या रागाच्या भरात नोकराच्या हस्ते गम्याला बोलावून आणले व मागचा पुढचा विचार न करता काठीने फोडून काढले. दुसरे दिवशी बिचारा गम्या नित्यनेमाने पुन्हा पाटलाच्या घरी गेला व त्यांना नमस्कर करुन नम्रता धारण करुन घडल्या अपराधा बाबत क्षमा मागुन जनावरे सोडली व पुन्हा चारावयास घेऊन गेला. नेहमी प्रमाणे ईश्वर चिंतनात मग्न होऊन गेला. आदल्या दिवशी घडलेला सर्व प्रकार गावातील सर्व लोकांना माहीत होताच, दुसरे दिवशी गावातील एक सज्जन गृहस्थ पाटलाच्या वाडीत झालेले नुकसान पाहण्यास गेले.

ते पाहून त्याना फार आश्चर्य वाटले. हे कसे काय घडले ? हा काय चमत्कार ? ते गृहस्थ घरी आले व पाटलानां सागितले. की शेतीचे नुकसान बरोबर न पाहता गमाजीला फोडून काढले तेवढ्यात गावातील लोक तेथे जमू लागले. लोकांनी पाटलास सांगितले की पाटील आपल्या शेतातील कोहळयाची पूर्ण फसल सुरक्षित आहे.व मोठमोठे कोहळे सुध्दा वेलाना लागलेली आहेत. हे ऐकून पाटलाचा राग अनावर झाला. तुम्ही मला मुर्ख बनवीत आहात. तेव्हा पाटील व गावातील लोक पाटलाच्या शेतात गेले. पाटलानी सर्व चमत्कार पाहिला व त्याचे गर्व एकदम उतरले. पाटील सर्वा समक्ष लज्जीत झाले व गमाजीला मारल्या बद्दल त्याना पश्चाताप वाटला. व सर्व लोका समक्ष धावत गेले व गमाजीचे पाय पकडले. लोकांनी गमाजीला घरी आणले व त्यांनाव नोकरीवर न ठेवता त्याची सर्व करु लागले. श्रीगुरु काशीनाथा महाराजा गमाजीचे गुरु होते. गुरु कृपेने गावात भागवत सप्ताह करण्याची सर्वाची इच्छा झाली. भाजी पोळी व भात व तुप पुरण पोळी करण्याचे ठरविले. सप्ता असल्यामुळे अफाट जनसमुदाय जमा झाला. पंगती बसण्यास सूरुवात झाली वाढणारांनी वरण भात भाजी पुरण पोळी आणि तूप वाढायला सुरवात केली. पंगती बसत. सर्व अन्न भरपूर होते. पण तूप संपले गावात कोणा कडेही तूप शिल्लक नव्हते.

हा सर्व प्रकार गमाजी महाराज पहात होते. सर्व प्रमुख मंडळी महाराजा समोर जाऊन उभी राहिली गमाजीचे पाय धरले. महाराज म्हाणाले सर्वानी आपल्या घरचे गुंड घेऊन या व नदीतुन गुंड भरुन पांढरा शुभ्र फडक्यानी गुंडाचे तोड बांधा व अन्नपूर्णाच्या नावाने जयघोष केला. गमाजी महाराजानी पाडुरंगाचे स्मरण केले व पंगत वाढण्यास सागितले. गुंडावरचे कापड काढले. पाहतात तो ज्या गुंडात गंगेचे पाणि भरुन आणले होते.त्याचे तूप झाले होते. लोकांनी समाधानाने जेवन केले व झालेल्या चमत्काराच्या गोष्टी करीत राहीले. गमाजीची संत महात्म्यांमध्ये गणती होऊ लागली व गमाजी महाराजानी गावात जिवंत समाधी घेतली.! या निमित्ताने समाधी दिन सोहळा दि. २८ -०८ -२०२२ रविवारला साजरा होत आहे .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles