मुंबई मेट्रो ३ च्या भुयारी ट्रेनची चाचणी

मुंबई मेट्रो ३ च्या भुयारी ट्रेनची चाचणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: शहरात नव्याने जी लाइफलाइन तयार होत आहे. त्या मेट्रो 3 च्या पहिल्या ट्रेनचे टेस्टिंग केले आहे. यशस्वीरित्या हे टेस्टिंग झाले आहे. आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हा सिग्नलच आपण दिला आहे. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मेट्रो 3 च्या पहिल्या ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली, ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी कोणते काम केले असेल तर ते म्हणजे या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये काहीही अडचणी राहिलेल्या नाहीत. काही आल्याच तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असे फडणवीस म्हणाले.

मेट्रो प्रकल्प 2023 च्या मार्चपर्यंत पूर्ण धावू शकला असता. परंतु काही वादविवाद झाल्याने डिसेंबर पर्यंत अर्धा धावणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला नसता तर पुढील चार वर्षे मेट्रो धावली नसती. मेट्रोच्या कार शेडचा वाद हा पर्यावरणापेक्षा जास्त राजकीय झाला. कोर्टाने कार शेड तयार करण्यासाठी परवानगी दिली. पर्यावरणाला सगळ्यात जास्त सपोर्ट करणारी मेट्रो 3 आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles