Home ताज्या घटना अमित शहांनी हाती घेतली बिहारची सुत्रे; विशेष लक्ष देणार

अमित शहांनी हाती घेतली बिहारची सुत्रे; विशेष लक्ष देणार

54

अमित शहांनी हाती घेतली बिहारची सुत्रे; विशेष लक्ष देणारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठा सत्ताबदल झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासोबतच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. ते सात पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. या आघाडीला अपक्षांचा पाठिंबा आहे. महाआघाडीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, हम आणि डावे पक्ष आहेत. मात्र या मोठ्या सत्ताबदलानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता स्वतः बिहारवर आपलं लक्ष केंद्रित केले आहे.

राज्यातील सत्ताबदलानंतर पक्षसंघटनेत पुन्हा उभारीआणण्याची जबाबदारी आता अमित शहा यांनी स्वतःकडे घेतली आहे. शहा गणेशोत्सवानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बिहार दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ते जयपूरचाही दौरा करून राजस्थानातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. त्यानंतर नड्डा यांनीही पाटणा दौरा केला होता. मात्र, त्यातून भाजप हायकमांडला ‘अपेक्षित’ परिणाम न दिसल्याने आता शहा स्वतः बिहार मुक्कामी २ दिवस जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यानंतर राजदच्या कलंकित मंत्र्यांविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडण्यासाठी बिहार भाजपमध्ये नवा जोश येईल असे मानले जाते.

दरम्म्यान, सत्ताबदलानंतर लगेच गेल्या आठवड्यात राष्ट्रीय जनता दलाचे विधान परिषद सदस्य सुनील सिंह यांच्या बिहारमधील पटना येथील अनेक ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. सुनील सिंह हे आरजेडी प्रमुख लालू यादव यांच्या जवळचे मानले जातात. त्याचवेळी दुसरीकडे कटिहार मेडिकल कॉलेजमधील प्रमुख आरजेडीचे राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्या जागेवर सीबीआयचे छापा टाकला. पुढे राज्यसभा खासदार फयाज अहमद यांच्या ठिकाणावरही सीबीआयने छापे टाकले. यावेळी झारखंड आणि बिहार दोन्ही राज्यात बेकायदेशीर खाणकाम आणि नोकरी घोटाळ्याप्रकरणी 25 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आलेत.