Home ताज्या घटना अरेच्चा.!! शिवसेनेला पुन्हा धक्का; ‘हे ही’ जाणार शिंदे गटात

अरेच्चा.!! शिवसेनेला पुन्हा धक्का; ‘हे ही’ जाणार शिंदे गटात

65

अरेच्चा.!! शिवसेनेला पुन्हा धक्का; ‘हे ही’ जाणार शिंदे गटात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई : राज्यातील 50 आमदारांसोबत बंड करुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना अर्थातच उद्धव ठाकरे यांना मोठा झटका दिला होता. यानंतर अनेक आमदारांनी शिवसेनेला रामराम ठोकला. अशातच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून मोठी बातमी समोर आली आहे. या मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.

*उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का*

शिंदे गटात एन्ट्री मारणार असल्याची घोषणा चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कधीही भेटीसाठी वेळ दिला नाही, अशी नाराजी चव्हाण यांनी व्यक्त केली.

*सदानंद चव्हाण लवकरच शिंदे गटात*

चव्हाण यांच्या या निर्णायामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय वाद सुरु असताना आता चव्हाण यांनी राजकीय भूकंप केला आहे. माझा पराभव झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीही भेटीसाठी वेळ दिला नाही, असं ते म्हणाले.

येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी मी शिंदे गटात प्रवेश करणार आहे, असं चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले. चव्हाण शिंदे गटात सामील झाल्यावर शिंदे गटाला रत्नागिरी जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे.