सिलवासा येथे ‘मराठा सेवा संघा’चा संवाद दौरा उत्साहात संपन्न

सिलवासा येथे ‘मराठा सेवा संघा’चा संवाद दौरा उत्साहात संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_उद्योग क्षेत्रात तरूणांनी आपले भवितव्य घडवावे; अनंतराव निकम_

सिलवासा: मराठा सेवा संघ, दादरा नगर हवेली तर्फे आयोजित पदाधिकारी संवाद दौरा सिलवासा येथे आज दिनांक १० सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. या निमित्ताने सिलवासा येथे संपन्न झालेल्या ‘संवाद दौरा’ या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरून डॉ. संजय पाटील, अविनाश पाटील, निर्मला पाटील,वनिताताई काळे, प्रा एम. एल. देशमुख, सोपान क्षीरसागर आदी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .

याप्रसंगी सर्व पदाधिका-यांचे मराठा सेवा संघ, दादरा नगर हवेलीच्या वतीने स्वागत करण्यात आले. मराठा सेवा संघ दादरा नगर हवेलीचे प्रदेशाध्यक्ष अनंतराव निकम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या मनोगतात त्यांनी मराठा समाजाला बदलत्या काळात आवश्यक असणाऱ्या परिवर्तनावरती विशेष भर दिला. विशेष करून उद्योग क्षेत्रात मराठा तरुणांनी आपले भवितव्य घडवावे व स्वतःचा पर्यायाने समाजाचा विकास होईल अनंतराव निकम म्हणाले.

डॉ संजय पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रत्येकाच्या घरात पुस्तक व ग्रंथालयाची गरज काय असते हे सुंदररित्या विषद केले. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. निर्मलाताई पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्त्रियांनी पुढे येण्यासाठी कोणता मुलमंत्र जोपासला पाहिजे यावर सुंदर विचार मांडले.
प्रा एम एल देशमुख यांनी याप्रसंगी आपल्या मनोगतातून मराठा सेवा संघाची पंचसूत्री विषद केली तर अविनाश पाटील यांनी तरूणांनी फक्त नौकरीच्या मागे न लागता व्यवसायावर भर देण्याचे सांगितले.

दादरा नगर हवेली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे पदाधिकारी डॉ संजय पाटील,राष्ट्रीय कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ, डॉ.निर्मलाताई पाटील राष्ट्रीय अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड,डॉ सोपान क्षिरसागर राष्ट्रीय अध्यक्ष सहकार परिषद,प्रा एम एल देशमुख राष्ट्रीय अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद ,वनिताताई काळे राष्ट्रीय महासचिव जिजाऊ ब्रिगेड, अविनाश पाटील प्रभारी मराठा सेवा संघ दादरा नगर हवेली, अनंतराव निकम प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ दादरा नगर हवेली, भाऊसाहेब डेरे कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ दादरा नगर हवेली, संदीप पाटील सर कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ दादरा नगर हवेली इत्यादी पदाधिका-यांनी हजेरी लावली. दरम्यान सिलवासा येथे खरंतर वादळी पावसातही या कार्यक्रमांमध्ये महिलांची असलेली उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांची उपस्थिती व त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सदर कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष किशोर जाधव व कुणबी समाजाचे अध्यक्ष आनंद पाटील यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्षापदी विद्या कणसे व सचिवपदी मनिषा वाघ यांची नियुक्ती डॉ निर्मला पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली, तर उर्वरीत कार्यकारणीची निवड लवकरच करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्षा सविता पाटील ठाकरे जिजाऊ ब्रिगेड सिलवासा दादरा नगर हवेली यांनी याप्रसंगी सांगितले.

आयोजित संवाद दौरा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादरा नगर हवेली ‘जिजाऊ ब्रिगेड’च्या प्रदेशाध्यक्ष सविता ठाकरे यांनी केले तर आभार प्रशांत ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादरा नगर हवेली येथील मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब डेरे,संदीप पाटील तसेच इतर पदाधिकारी राजेंद्र वाघ, प्रफुल्ल सोनवणे, शरद बोरसे, विनोद सोनवणे ,चंद्रशेखर कणसे, कुंदन बच्छाव, राजेंद्र वाघ सर, पुरुषोत्तम पाटील ,भरत सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles