बुटीबोरी एम आय डी सी मार्ग जाम, ७ किमी लांबच लांब वाहनाच्या रांगा

बुटीबोरी एम आय डी सी मार्ग जाम, ७ किमी लांबच लांब वाहनाच्या रांगा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विनोद चव्हाण, बुटीबोरी प्रतिनिधी

नागपूर: भारत आस्ट्रेलिया दरम्यान होत असलेल्या आजच्या सामन्यासाठी आंतराराष्ट्रीय स्टेडीयम जामठा येथील चहुबाजूंची ६ किमी दूरवर वाताहत नागपूर ग्रामिण शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक वळविली असल्याने, याचा फटका हिंगणा बायपास ते बुटीबोरी एम आय डी सी मार्गास बसला असून आज सायंकाळी ५.०० वाजल्यापासून ते बातमी लिहेपर्यंत दुतर्फा ७ किमी पर्यंत वाहतूक खोळंबली होती.

जामठा स्टेडीयमच्या चहूबाजूंनी वाहतूक मार्ग बंद केल्याने जड वाहनांना एका जागी थांबावे लागले. दरम्यान, नागपूर अमरावती समृद्धी महामार्ग ते हिंगणा एम आय डी सी बायपास या महामार्गावर सुमारे दोन तासापासून चक्का जाम झाल्याने सुमारे ७ किमी पर्यंत दुतर्फा ट्रक, कार, बस तसेच दुचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.

या महामार्गावर बुटीबोरी वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेचे फक्त दोन पोलीस कर्मचारी दिसून आले. परंतु ७ किमी पर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगा तसूभरही हलल्या नाही. वाहतूक नियंत्रण शाखेच्या नियोजनाचा अभाव या चक्काजामने दिसून आला. संध्याकाळी घरी जाणारे कर्मचारी या रस्त्यावर झालेल्या जामने अक्षरश: फसले असून अजूनही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles