अरेच्चा..! मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर एकनाथ शिंदेंचा मुलगा डॉ. श्रीकांत
मुंबई : शिवसेनेशी बंड ते राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रत्येक टप्प्यावर सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात नवीन वादाला तोंड फुटले.
त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे छायात्रित्र व्हायरल झाले.
त्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्विटवर हा फोटो अपलोड केला. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसलेले दिसत आहेत. या फोटोवरून सध्या मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे.