
राहुल नार्वेकरांची हेडगेवार स्मृती मंदिरास भेट
नागपूर: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादन केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार आणि नेते उपस्थित होते.
राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी हिवाळी अधिवेशन तयारीची आढावा घेतला होता. त्यानंतर आज ते सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली आहे. त्यानंतर ते आज संघाच्या राष्ट्रीय रक्षा मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले आहे.